सेवानिवृत्तीचं वय बदलणार? कर्मचाऱ्यांच्या वाढत्या वयानं ‘चीन’च्या डोक्याला ताप!

सेवानिवृत्तीचं वय बदलणार? कर्मचाऱ्यांच्या वाढत्या वयानं ‘चीन’च्या डोक्याला ताप!

Retirement Age in China : कामकाज करणाऱ्या लोकांच्या वाढत्या वयाने चीन सरकार हैराण (Retirement Age in China) झाले आहे. त्यामुळे आता नवा निर्णय घेण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार सरकारी पातळीवर केला जात आहे. यासाठी एक योजना तयार केली जात आहे. घटता जन्मदर आणि वयस्कर लोकांच्या संख्येत वाढ होत असल्याने चीनमध्ये (China News) काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे.

त्यामुळे आता सरकार कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा प्लॅन आखत आहे. सरकारच्या या प्लॅनिंगवर नागरिक मात्र नाराज असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या शहरी भागात पुरुष कर्मचारी वयाच्या 60 व्या वर्षी सेवा निवृत्त होतो. महिला कर्मचऱ्यांच्या निवृत्तीचे वय त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार 50 ते 55 दरम्यान आहे.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नुकत्याच झालेल्या तिसऱ्या बैठकीत अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. चीनची अर्थव्यवस्था (China Economy) सध्या वाढते सरकारी कर्ज, सुस्त पडलेला विकास दर या संकटाना तोंड देत आहे. देशातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात कशा पद्धतीने वाढ करता येईल या मुद्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारताला खुपणाऱ्या प्रोजेक्टमध्ये इटलीची एन्ट्री? मेलोनींच्या चीन दौऱ्यात काय घडलं..

चीनच्या लोकसंख्येत होणार घट

जुलै महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सन 2024 मध्ये देशाची लोकसंख्या 141 कोटी आहे. सन 2054 मध्ये मात्र लोकसंख्या 121 कोटी इतकी असेल. म्हणजेच आगामी काळात चीनच्या लोकसंख्येत घट होणार असल्याचा अंदाज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. चीनच्या एक रिपोर्टनुसार 60 आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 21.1 टक्के होती. कामकाज करणाऱ्या म्हणजेच 16 ते 60 वर्षांच्या वयोगटातील लोकांची संख्या 864.81 मिलियन (61.3%) इतकी आहे.

युवकांना रोजगाराच्या कमी संधी

सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार सरकारकडून केला जात असला तरी यासाठी कोणतीही मोहिम सुरू करण्याची घोषणा केलेली नाही. रिटायरमेंटला योग्य पद्धतीने लागू करण्यासाठी सरकार आगामी काळात पावले उचलेल. तसेच वयस्कर लोकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करील. या योजनेवर बऱ्याच दिवसांपासून काम सुरू आहे. आता तर नागरिक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देखील देऊ लागले आहेत. पेन्शन उशिरा मिळेल अशी भीती लोकांनी व्यक्त केली आहे तर रोजगाराच्या संधी कमी होतील अशी भीती युवकांनी व्यक्त केली आहे.

Ismail Haniyeh : इराणमध्ये काय करत होता हनिया, कशी झाली हत्या? वाटा ए टू झेड

भारतात किती आहे रिटायरमेंटचं वय

भारताचा विचार केला तर येथे निवृत्तीचं वय एकसारखं नाही. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये निवृत्तीचं वय 60 वर्षे आहे तर राज्यांमध्ये 58 ते 60 च्या दरम्यान आहे. देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षकांचे निवृत्तीचे वय 62 वर्षे आहे. याआधी भारतात सेवा निवृत्तीच वय 60 वर्षे होतं. मात्र 60 च्या दशकात यामध्ये बदल करून 58 करण्यात आलं. मे 1998 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय पुन्हा 60 वर्षे केलं. असं असलं तरी भारतात ना युवकांची कमतरता आहे ना कामकाजी लोकसंख्येची.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube