Team India च्या विजयावरील आयुष्मानच्या कवितेचा धुमाकूळ! तब्बल 20 मिलियन व्ह्युजचा टप्पा पार
Ayushmann Khurrana on Team India victory in T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट संघाने (Team India) टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे. (T20 World Cup 2024) या ऐतिहासिक विजयानंतर अनेक बी-टाऊन सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यात बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) एक हृदयस्पर्शी कविता केली. भारताच्या T20 वर्ल्ड कप विजयावर समर्पित त्याची कविता 20 मिलियन हून अधिक व्ह्यूज मिळवत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे!
T20 WC : मोदींनी पुन्हा संधी साधली; जगजेत्या संघाला मान देत जिंकली करोडोंची मनं
भारतात आणि जगभरातील भारतीयांसोबत ही कविता भावनिकदृष्ट्या कशी जोडली गेली याबद्दल विचारल्यावर आयुष्मान म्हणतो, ज्या रात्री भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला, त्या रात्री मी खूप वेळ झोपू शकलो नाही. हे वैयक्तिक वाटलं कारण आपलं हृदय भारतासाठी उत्कटतेने धडधडतं आणि हा विजय खूप दिवसांनी आला होता. त्यामुळे, जेव्हा दुसऱ्या दिवशी उठलो, तेव्हा मला टीमसाठी, त्यांच्या निर्धारासाठी आणि आवाजाच्या गोंधळातून बाहेर पडून देशाला सर्वोच्च गौरव मिळवण्यासाठी काहीतरी लिहायचं होतं.”
आमदारांचा निरोप समारंभ अन् देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले, जयंत पाटील हे कधी आमच्या …
तो पुढे म्हणतो, “जे काही मी लिहिलं, ते माझ्या मनातून सरळ बाहेर आलं आणि मला आनंद आहे की, ते भारतात आणि जगभरातल्या भारतीयांमध्ये एवढं गाजलं. आपण आपल्या विजयाच्या क्षणी एकत्रित होतो आणि ते खोलवर जाणवलं.” आयुष्मान भारताच्या एकता आणि विविधतेसाठी या विजयाबद्दल अत्यंत आनंदी आहे. तो म्हणतो, “आपल्या चित्रपटसृष्टीप्रमाणेच क्रिकेटसुद्धा धर्माचा एक अद्भुत मिश्रण आहे – भारतातील विविधतेचे खरे उदाहरण आहे . हा विजय त्या विविधतेचंही एक उत्सव आहे. जेव्हा भारताने वर्ल्ड कप उचलला, तेव्हा ते अविस्मरणीय क्षण होते.”