रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीन दौऱ्यावर; ‘नो लिमिट्स’बाबत मोठ्या घोषणांची शक्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीन दौऱ्यावर; ‘नो लिमिट्स’बाबत मोठ्या घोषणांची शक्यता

Putin China Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) दोन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग (Xi Jinping) यांनी पुतिन यांचे जोरदार स्वागत केले असून या दौऱ्यादरम्यान, जिपनिंग यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ‘नो लिमिट्स’च्या भागीदारीबाबत मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, युक्रेनसोबत युद्धादरम्यानच ही बैठक होत असल्याने पुतिन यांच्या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झालंय.

BCAS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांच्या 108 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. पुतिन आणि जिपनिंग यांच्या या भेटीमुळे रशिया आणि चीनचे दृढ संबंध असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी मॉस्कोने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशिया पूर्णपणे चीनवर अवलंबून असतानाच ही बैठक होत आहे.

Bhushan Kadu: ‘हास्यजत्रा शोची मनाविरुद्ध एक्झिट’, अभिनेत्याने सांगितला खडतर काळातील प्रसंग

‘नो लिमिट्स’ भागीदारीवर चर्चा :
दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान पुतिन जिपनिंग यांच्यासह इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. या बैठकीमध्ये 2022 साली स्वाक्षरी करण्यात आलेल्या नो लिमिट्स भागीदारीबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वीच नो लिमिट्स भागीदारीवर स्वाक्षरी करण्यात आली होती. आता या बैठकीनंतर मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याचीही शक्यता आहे.

देश एका नव्या वळणावर नेण्यात जिपनिंग यांची महत्वाची भूमिका :
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा हा पहिलाच विदेश दौरा असून चीनमध्ये दाखल होताच पुतिन यांनी शी जिपनिंग यांचे कौतूक केले असून दोन्ही देशांना एका नव्या वळणावर नेण्यात जिपनिंग यांची महत्वाची भूमिका असल्याचं पुतीन म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज