गुप्त दस्तावेज, पॉर्न स्टारला पैसे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर वाढतं कायदेशीर टेन्शन

गुप्त दस्तावेज, पॉर्न स्टारला पैसे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर वाढतं कायदेशीर टेन्शन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतर गोपनीय कागदपत्रे (Confidential documents) जवळ ठेवल्याचा आरोप तपास यंत्रणांनी त्यांच्यावर केला आहे. मात्र, मी निर्दोष आहे, असं ते सांगत आहेत. दरम्यान, या प्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते. अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. (confidential documents, secret payments to porn; Donald Trump’s troubled rise)

गोपनीय कागदपत्रे निवासस्थानी ठेवल्याचे आरोप सिध्द झाल्यास ट्रम्प यांना 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळं व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा निवडून जाण्याचे त्यांचे स्वप्न भंग होऊ शकते. यापूर्वीही ट्रक यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये एका पोर्न स्टारला गप्प बसण्यासाठी गुपचूप पैसे दिल्याचा आरोपही ट्रम्प यांच्यावर यापूर्वी करण्यात आला आहे.

Lavanya Tripathi Engagement: थाटात पार पडला वरुण तेज अन् लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा; सेलिब्रिटींनी लावली हजेरी 

घरात गुप्त कागदपत्रे ठेवण्याचे प्रकरण

ऑगस्ट 2022 मध्ये, एफबीआयने डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील घरावर शोध वॉरंटसह छापा टाकला. तेव्हा एफबीआयला त्यांच्या घरी गोपनीय कागदपत्रे मिळाली होती. त्यांच्यावर ट्रम्प यांच्यावर गोपनीय माहिती बाळगणे, न्यायात अडथळा आणणे, खोटी वक्तव्ये करणे असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी कोणते गुन्हे दाखल केले जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर सांगितले की, त्यांना मियामी येथील फेडरल कोर्टहाऊसमध्ये मंगळवारी दुपारी 3 वाजता हजर राहण्यासाठी बोलावण्यात आले होते.

पॉर्न स्टारला पैसे दिल्याचा आरोप

ट्रम्प यांच्यावर गेल्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी आपल्या अफेअरबद्दल कोणालाही न सांगण्यासाठी पॉर्न स्टार डॅनियल्सला गुपचूप पैसे दिल्याचा आरोप आहे. अध्यक्षीय प्रचाराच्या शेवटी, ट्रम्पचे वकील मायकेल कोहेन यांनी डॅनियल्सला गप्प राहण्यासाठी $130,000 डॉलर देण्याची व्यवस्था केली. अमेरिकन मीडियाने ही बातमी उघडकीस आणल्यानंतर कोहेन यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले. 2018 मध्ये, त्यांना कर आणि बँक फसवणुकीसह फेडरल मोहिमेच्या वित्त कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविले. कोहेन यांनी साक्ष दिली की ट्रम्प ऑर्गनायझेशनने डॅनियल्सला पैसे देण्यासाठी आपल्याला पैसे दिले.

कॅपिटल हिल हिंसाचार प्रकरण

वॉशिंग्टनमधील यूएस कॅपिटल बिल्डिंग (यूएस संसद भवन) च्या बाहेर 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या हिंसाचारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष निवड समितीने डिसेंबर 2022 मध्ये अंतिम सुनावणी घेतली. तपास समितीचे उपाध्यक्ष लिझ चेनी म्हणाले की, पुरावे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोर नैतिक अपयशाकडे निर्देश करतात. कॅपिटल हिलच्या घटनेला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत, असं ते म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube