ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाबद्दल मोठी अपडेट! चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफ मागे घेणार?

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाबद्दल मोठी अपडेट! चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफ मागे घेणार?

Donald Trump will back tarrif from contry without China : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे. भारतावर 27 टक्के, तर चीनवर 34 टक्के अतिरिक्त कर लावलाय. मात्र यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेकडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफ मागे घेण्यात येणार आहे.

2019 ला दानवेंनी पैसे वाटून माझा पराभव केला; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

काही मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता 90 दिवसांसाठी सर्व देशांवरील टॅरिफ कर थांबवण्याचा विचार केला आहे. मात्र व्हाईट हाऊसकडून अद्याप या बातमीची पुष्टी करण्यात आलेली नाही. क्या पॅरिस धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे. तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे.

मुस्कान आई होणार, प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह; जाणून घ्या तुरुंगात जन्मलेल्या मुलाचे हक्क काय?

दोन आठवड्यांपूर्वी वीस टक्के आयात शुल्क लावले होते. त्यामुळे आता चीनच्या वस्तूंवर अमेरिकेने 54 टक्के कर लावला आहे. त्यामुळे चीनच्या वस्तू अमेरिकेत महाग होणार आहे. त्याचा फटका चीनच्या उत्पादनाला बसणार आहे. आता चीनने ही अमेरिकेचे (America) टॅरिफ हत्यार त्यांच्यावर उगरले आहे. चीनने अमेरिकेवर 34 टक्के आयात शुल्क लादले आहे. या निर्णयापूर्वी गुरुवारी या आयात शुल्क युद्धामुळे अमेरिकेचे बाजार जोरदार कोसळले आहेत. त्यात आणखी घसरण होऊन अमेरिकेचा शेअर बाजारात मंदीचा धोका आहे.

खुलताबादचे नामांतर करा, संजय शिरसाटांची मागणी, जाणून घ्या नावाचा इतिहास काय?

अमेरिकन सरकारने देशात आयात होणाऱ्या सर्व चिनी वस्तूंवर परस्पर शुल्क लादले आहे. अमेरिकेचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे जे चीनच्या कायदेशीर अधिकारांना हानी पोहोचवते. ही अशी धमकी आहे जी केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचवेल असे नाही. तर जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करणारे असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या मंत्रालयाने अमेरिकेला हे शुल्क काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. चीनने अमेरिकेला वाटाघाटीद्वारे त्यांचे एकतर्फी शुल्क उपाय ताबडतोब काढून टाकण्याची विनंती केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube