मुस्कान आई होणार, प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह; जाणून घ्या तुरुंगात जन्मलेल्या मुलाचे हक्क काय?

Muskan Rastogi : सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी (Muskan Rastogi) आई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सीएमओ डॉ. अशोक कटारिया (Dr. Ashok Kataria) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुस्कानचा प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुरुंग प्रशासनाकडून पत्र मिळाल्यानंतर, मुस्कानची प्रेग्नेंसी टेस्ट करण्यासाठी एक टीम पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये मुस्कान आई होणार असल्याची माहिती समोर आली आहे असं सीएमओ डॉ. अशोक कटारिया म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभ राजपूतची (Saurabh Rajput) हत्या केली होती आणि सौरभच्या शरीराचे तुकडेकडून एका निळ्या ड्रममध्ये टाकून त्यात सिमेंट ओतले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे आता मुस्कानचा प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तुरुंगात मुस्कानच्या मुलाला कोणते अधिकार मिळणार आणि यासाठी भारतीय कायद्यानुसार तुरुंगात जन्मलेल्या मुलाला कोणते अधिकार देण्यात आले याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोराने सुरु आहे.
नियम काय?
आज देशातील अनेक तुरुंगात अनेक महिला आहेत ज्या गर्भवती आहेत किंवा नवजात बाळासह तुरुंगात शिक्षा पुर्ण करत आहे. मात्र भारतीय कायद्यानुसार या महिलांना काही अधिकार देण्यात आले आहे. नियमांनुसार, अशा महिलांना बाळाच्या जन्मानंतर एक महिना वेगळ्या कक्षात ठेवले जाते जेणेकरून बाळाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये आणि त्याची योग्य काळजी घेतली जाऊ शकेल. जर एखाद्या महिला कैद्याला आधीच लहान मूल असेल तर तिला 6 वर्षांचे होईपर्यंत तिच्या आईसोबत तुरुंगात राहण्याची परवानगी आहे. या काळात, तुरुंग प्रशासन तुरुंगातील वातावरणाचा मुलावर परिणाम होणार नाही याची काळजी घेते आणि यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात येते.
मुलाला हे अधिकार मिळतात
भारतीय कायद्यानुसार, तुरुंगात जन्मलेल्या मुलांनाही इतर मुलांसारखे पूर्ण अधिकार मिळतात. त्यांना जीवनाचा अधिकार, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता असे अधिकार मिळतात. मुलांच्या विकासासाठी पुरेशी व्यवस्था करणे ही तुरुंग प्रशासनाची जबाबदारी असते.
खुलताबादचे नामांतर करा, संजय शिरसाटांची मागणी, जाणून घ्या नावाचा इतिहास काय?
नियमांनुसार, जर मुले लहान असतील तर त्यांना त्यांच्या आईसोबत राहण्याची परवानगी आहे. जेव्हा मूल थोडे मोठे होते तेव्हा तुरुंग प्रशासन त्याच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था करते, अगदी त्याच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. तर दुसरीकडे एनसीआरबीच्या 2023 च्या अहवालानुसार भारतातील तुरुंगांमध्ये 23,772 महिला आहेत. यामध्ये 1537 महिला अशा आहेत ज्या त्यांच्या मुलांसह तुरुंगात राहतात.