लेबनॉनमधील हल्ल्यांनी UAE ला धडकी! पेजर अन् वॉकी-टॉकी तत्काळ होणार जप्त

लेबनॉनमधील हल्ल्यांनी UAE ला धडकी! पेजर अन् वॉकी-टॉकी तत्काळ होणार जप्त

Dubai News : लेबनॉनची राजधानी बेरुतसह काही ठिकाणी १७ सप्टेंबर रोजी (Israel Lebanon War) भीषण स्फोट झाले होते. संदेश पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेजरमध्ये अचानक (Pager Blast) स्फोट झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी पाच हजार पेजर एकाच वेळी फुटले. या स्फोटांत जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या स्फोटांत इराण (Iran) समर्थित हिजबुल्लाचे लोक आणि लेबनॉनमधील इराणचे (Israel Lebanon Conflict) राजदूतही जखमी झाले होते.

या स्फोटांनंतर जगभरात खळबळ उडाली होती. या स्फोटांना पंधरा दिवस उलटून गेले आहेत. आपल्या देशात असे स्फोट होऊ नयेत याची खबरदारी अनेक देशांकडून घेण्यात येत आहेत. या स्फोटानंतर संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईने (UAE) एक मोठा निर्णय घेतला आहे. दुबईत (Dubai News) येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या प्रत्येक विमानातील प्रवाशांना चेक इन किंवा केबिन बॅगेजमध्ये पेजर आणि वॉकीटॉकी घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Israel-Gaza Conflict: इस्राइलच्या गाझामध्ये पुन्हा बॉम्बहल्ला, 41 पॅलेस्टिनी ठार, हल्ल्याचे कारणही सांगितले

याबाबत एका निवेदनात म्हटले आहे की जर विमानातील कोणत्याही प्रवाशाकडे पेजर आणि वॉकी टॉकी आढळून आले तर या उपकरणांना दुबई पोलिसांकडून तत्काळ जप्त करण्यात येईल. देशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुबईत रोज विदेशांतून रोज हजारो लोक येथे येतात. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर करण्यात आली आहे.

लेबनॉननेही घेतला मोठा निर्णय

लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकीटॉकीत स्फोट झाल्यानंतर राजधानी बेरुतच्या विमानतळावरून जाणाऱ्या सर्व विमानांत पेजर आणि वॉकीटॉकीवर बंदी घालण्यात आली आहे. याच पद्धतीचा निर्णय युएईने घेतला आहे. तसं पाहिलं तर आजमितीस युएई आणि लेबनॉन यांच्यात एकही फ्लाइट नाही. तसेच येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. 5 ऑक्टोबरपर्यंत इराक, इराण आणि जॉर्डनसाठी सर्व नियमित उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत.

लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट, 300 जखमी

लेबनॉनध्ये पेजरमध्ये स्फोट

17 सप्टेंबर रोजी हिज्बुल्लाच्या सैनिकांकडून वापरण्यात येत असलेल्या पेजरमध्ये अचानक स्फोट झाल्याने 1000 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. माहितीनुसार,या स्फोटमध्ये  12 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने मंगळवारच्या स्फोटांपूर्वी हिजबुल्लाहने खरेदी केलेल्या पेजरमध्ये स्फोटके ठेवली होती. या हल्ल्यात मृतांची संख्या दोन मुलांसह 12 झाली असल्याची माहिती लेबनॉनचे आरोग्य मंत्र्यांनी दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube