भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली दिल्ली

भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली दिल्ली

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, त्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील फैजाबाद होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 होती आणि ती संध्याकाळी 7.55 वाजता आली. सध्या कोठूनही कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती नाही.

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील सांबा, कठुआ, डोडा, उधमपूर, जम्मू, कटरा आणि श्रीनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

यापूर्वी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. पण तेव्हा त्याची तीव्रता फक्त 3.8 होती. 1 जानेवारी रोजी हरियाणात दुपारी 1:19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी झज्जरचे बेरी हे भूकंपाचे केंद्र होते. याआधी 31 डिसेंबरच्या रात्रीही याच भागात भूकंपाचे झटके बसले होते. 1 जानेवारीला रात्री उशिरा मेघालय नोंगपोहमध्ये रिश्टर स्केलवर 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळीही दिल्ली हादरली होती.

भूकंप अभ्यासकांचं हे म्हणणं आहे आपल्या देशातला 59 टक्के भाग हा भूकंप रिस्क झोनमध्ये येतो. देशातल्या पाचव्या झोनला सर्वात भयंकर आणि सक्रिय मानलं जातं. या झोनमध्ये येणाऱ्या राज्यांमध्ये भूकंपामुळे अतोनात नुकसान होऊ शकतं.

हा पाचवा आणि सर्वात भयंकर झोन आहे जम्मू काश्मीरचा भाग, हिमाचल प्रदेशातला पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरामधलं कच्छचं रण, बिहारचा उत्तर भाग आणि भारताची पूर्वोत्तर राज्यं, त्याचप्रमाणे अंदमान आणि निकोबार ही बेटंही.

चौथ्या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीरचा उर्वरित भाग, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे उर्वरित भाग, हरियाणा, पंजाबचा काही भाग, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचा छोटा हिस्सा हे भाग येतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube