तुरुंगात शेकडो महिलांवर अत्याचार अन् जिवंत जाळले; काँगोमध्ये नेमकं घडलं तरी काय?
![तुरुंगात शेकडो महिलांवर अत्याचार अन् जिवंत जाळले; काँगोमध्ये नेमकं घडलं तरी काय? तुरुंगात शेकडो महिलांवर अत्याचार अन् जिवंत जाळले; काँगोमध्ये नेमकं घडलं तरी काय?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Congo-Jailbreak_V_jpg--1280x720-4g.webp)
Congo Jailbreak Update : काँगोच्या (Congo) मुन्झेंजे तुरुंगात शेकडो महिला कैद्यांवर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहितीनुसार, रवांडा समर्थित एम23 (M23) बंडखोरांनी काँगोची राजधानी गोमा (Goma) ताब्यात घेतली आहे. त्यानंतर मुन्झेंजे तुरुंगात (Munzenje Turungat) शेकडो महिला कैद्यांवर बलात्कार त्यांनी जिवंत जाळण्यात आले आहे.
द गार्डियनच्या वृत्तानुसार, गोमा येथील मुन्झेंजे तुरुंगात सामूहिक जेलब्रेक दरम्यान शेकडो महिला कैद्यांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर महिला विंगला आग लावण्यात आली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. माहितीोनुसार आगीत सर्व महिला मरण पावले आहे. तर मुन्झेंजे तुरुंगातून 4,000 पेक्षा जास्त कैदी पळून गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
गोमा येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलाचे उपप्रमुख विवियन व्हॅन डी पेरे (Vivian van de Pere) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारो पुरुष तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले पंरतु महिला विंगमध्ये आग लावण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या (OHCHR) मते, संघर्षामुळे होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनांमध्ये सामूहिक बलात्कार आणि इतर लैंगिक हिंसाचाराचा समावेश आहे.
More than 100 female prisoners were raped and then burned alive during a jailbreak in the Congolese city of Goma, according to the UN.@ItsMainaKageni #MainaAndKingangi pic.twitter.com/zFcBjgcYbx
— Classic 105 Kenya (@Classic105Kenya) February 6, 2025
माहितीनुसार, काँगो आणि आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात खनिजांनी समृद्ध आहे. 1996-1997 आणि 1998-2003 च्या युद्धांमध्ये येथे लाखो लोक मारले गेले होत. तर गेल्या आठवड्यात 27 जानेवारी रोजी सकाळी M23 बंडखोरांनी गोमामध्ये घुसखोरी केली आणि त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. माहितीनुसार, रवांडाच्या समर्थित M23 बंडखोरांनी लादलेल्या निर्बंधांमुळे या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांना तुरुंगात प्रवेश करण्यास अडचण येत आहे.
जबरदस्त, पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा 4 विकेट्सने धुव्वा, भारतीय संघाचा शानदार विजय!
सध्या घटनेबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसली तरी काँगोमधील M23-नेतृत्वाखालील संघर्षातील हा सर्वात भयानक क्रूर प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. काँगोमधील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मंगळवारपर्यंत, गोमामध्ये सुमारे 2,000 मृतदेह अजूनही दफनविधीच्या प्रतीक्षेत होते. असा दावा देखील मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे.