भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी दिलं आश्वासन; ट्रम्प यांचा मोठा दावा
Donald Trump Big Claim On PM Modi : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावा माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Donald Trump Big Claim On PM Modi : भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा दावा माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असे पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर विरोधक पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत भारत आणि पाकिस्तान युद्ध मी थांबवले असल्याचा दावा केला होता.
माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आश्वासन दिले आहे की, भारत रशियाकडून (Russia) तेल खरेदी करणार नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत नाही, परंतु रशियासोबत सुरु असलेला तेल व्यापार तात्काळ थांबवणे सोपे नाही, यात एक प्रक्रिया समाविष्ट आहे जी पूर्ण होण्यास वेळ लागेल असं माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच रशिया आणि भारतामध्ये सुरु असणारा तेल व्यापार संपवल्याने युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना बळकटी मिळेल आणि केवळ भारताच्या भूमिकेमुळे रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी होऊ शकतो.
#WATCH | “Yeah, sure. He’s (PM Narendra Modi) a friend of mine. We have a great relationship…I was not happy that India was buying oil. And he assured me today that they will not be buying oil from Russia. That’s a big stop. Now we’ve got to get China to do the same thing…”… pic.twitter.com/xNehCBGomR
— ANI (@ANI) October 15, 2025
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Putin) यांना एकच विनंती आहे की युद्ध थांबवा, युक्रेनियन लोकांना मारणे थांबवा आणि रशियन लोकांना मारणे थांबवा कारण युद्धामुळे दोन्ही बाजूंचे लोक मारले जातात असं देखील माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यावर आतापर्यंत भारताकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर काही दिवसांपूर्वी 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती ज्याचा मोठ्या प्रमाणात भारतीय शेअर बाजारात परिणाम दिसून आला होता.
व्यवसायात होणार फायदा अन् …, जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?
ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि भारत व्यापारसंदर्भात मोठा दावा केल्याने याचा भारतीय शेअर बाजारात काय परिणाम पाहायाल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.