Israel Hamas War : …म्हणून हमासचा इस्त्रायलवर हल्ला, थेट भारताशी कनेक्शन; बायडेन यांचा दावा

Israel Hamas War : …म्हणून हमासचा इस्त्रायलवर हल्ला, थेट भारताशी कनेक्शन; बायडेन यांचा दावा

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. यामध्ये आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठा दावा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी हमासने इस्त्रायलवर होणाऱ्या हल्ल्याचं कनेक्शन भारताशी असल्याचं म्हटलं आहे.

हमासच्या इस्त्रायल हल्ल्याचं भारत कनेक्शन…

हमासकडून इस्त्रायलवर होणाऱ्या हल्ल्याचं कनेक्शन भारताशी आहे. दावा करताना बायडेन म्हणाले की, नुकतीच भारतात जी-20 परिषद पार पडली. यावेळी दिल्लीत झालेल्या या परिषदेत इंडियन मिडल ईस्ट युरोप कॅरिडॉरची घोषणा करण्यात आली होती. यामुळेच हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्याचा दावा बायजडेन यांनी केला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक विजेते Rockstar DSP ने मुंबईत केलं खास सेलिब्रेशन

पुढे ते म्हणाले की, इस्त्रायल हा सौदी अरबला युरोपशी जोडणाऱ्या रेल्वे लाईन योजनेमध्ये सहभागी झाला आहे. जी योजना जी-20 देशांसोबत पुर्ण केली जाणार आहे. हा कॅरिडॉर चीनच्या बेल्ट एंड इनिशिएटिव्ह म्हणजेच बीआरआयला टक्कर देणार आहे. त्यामुळे माझं आंतरमन म्हणतयं की, हमासकडून इस्त्रायलवर होणाऱ्या हल्ल्याचं हे देखील एक कारण आहे. मात्र आम्ही हे काम सोडू नाही शकत. यातून इस्त्रायलसाठी त्यांच्या देशांना जोडण्याचं काम करणार आहे.

Sanjay Raut : ‘आधी गुलाम आहोत स्पष्ट करा, टीका थांबवतो’; राऊतांनी CM शिंदेंना डिवचलं

दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना बायडेन यांनी हे कारण सांगितलं. ते म्हणाले की, आपण चीनच्या बेल्ट एंड इनिशिएटिव्ह म्हणजेच बीआरआयला टक्कर देणार आहोत. त्यात बेल्ट एंड इनिशिएटिव्ह कर्जात बुडाला आहे. ज्या राष्ट्रांचा यात सहभाग आहे. ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तेच देश जी 20 परिषदेत असून ते इंडियन मिडल ईस्ट युरोप कॅरिडॉरचा भाग आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube