धक्कादायक! केनिया मारणार दहा लाख भारतीय कावळे; सरकारचा प्लॅनही अजब

धक्कादायक! केनिया मारणार दहा लाख भारतीय कावळे; सरकारचा प्लॅनही अजब

Kenya Government Decision : भारतात पक्ष्यांना वाचविण्यासाठी मोहिमा आखल्या जात आहेत. पण भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या आफ्रिकेतील केनिया या देशाने (Kenya Government) अजबच निर्णय घेतला आहे. हा निर्णय काय आहे हे ऐकल्यानंतर प्रत्येक भारतीयाला केनियाचा राग येईल. परंतु, तेथील सरकारने हा निर्णय घेतला आहे. केनिया सरकारने 2024 या वर्षाच्या अखेरपर्यंत दहा लाख भारतीय कावळ्यांना मारण्याचा (Indian Crow) आदेश जारी केला आहे. पुढील सहा महिन्यात देशातील कावळे मारण्याचा हा प्लॅन आहे. सरकारच्या या निर्णयावर सध्या प्रचंड टीका केली जात आहे मात्र सरकार आपला निर्णय बदलण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.

केनिया सरकारने हा अजब निर्णय घेण्यामागचं कारणही समोर आलं आहे. केनियात सध्या कावळ्यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. यामुळे येथील नागरीक हैराण झाले आहेत. यामुळे पुढील सहा महिन्यांत जवळपास दहा लाख कावळे मारण्याचा आदेश देण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे हे कावळे केनियन परिसंस्थेत फारसे महत्वाचे नाहीत. या कावळ्यांनी येथील नागरिक आणि अन्य पक्षांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या कारणामुळे केनियन सरकारने या कावळ्यांविरुद्ध एक प्रकारचं युद्धच पुकारलं आहे.

केनियातून भारतात येणारे तब्बल 44 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

केनिया वाइल्डलाइफ सर्व्हिसेसचे म्हणणे आहे की भारतीय वंशाचे कावळे हे विदेशी पक्षी आहेत जे अनेक वर्षांपासून येथील समस्यांचे कारण बनले आहेत. केनियाच्या काही पक्षीतज्ज्ञांच्या मते भारतीय कावळे येथील अन्य प्रजातींच्या पक्षांसाठी धोकादायक बनले आहेत. मोठ्या संख्येत असलेले हे कावळे दुसऱ्या पक्षांची घरटी तोडून टाकतात त्यांची अंडी आणि पिल्लांनाही खातात. यामुळे अन्य पक्ष्यांच्या प्रजातीच नामशेष होण्याचा धोका वाढला आहे. यांसह समुद्री किनारपट्टीच्या परिसरातील दुसऱ्या पक्षांनाही कावळे त्रास देतात त्यामुळे येथे कीटकांची संख्या वारेमाप वाढली आहे.

केनियाच्या अर्थव्यवस्थेलाही या कावळ्यांनी संकटात टाकलं आहे. कावळ्यांची संख्या वेगाने वाढत चालल्याने पर्यटन उद्योग आणि हॉटेल व्यवसायाला फटका बसत आहे. कावळे हॉटेलमधील रुमच्या खिडक्या आणि छत खराब करतात. तसेच समुद्र किनारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांनाही त्रास देतात. या प्रकारांमुळे केनियाचा पर्यटन उद्योग अडचणीत सापडला आहे. देशात पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे. यामुळे कावळ्यांना मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे येथील सरकारला वाटत आहे. त्यामुळेच असा निर्णय केनियाच्या सरकारने घेतला आहे.

कंगाल पाकिस्तान! भारत स्ट्राँग, 30 वर्षांतला दोन्ही देशांचा विकासाचा ताळेबंद पाहाच..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube