Video : इंडोनेशियात 280 प्रवासी असलेली बोट पेटली, जीव वाचवण्यासाठी मारल्या समुद्रात उड्या, तिघांचा मृत्यू…

Video : इंडोनेशियात 280 प्रवासी असलेली बोट पेटली, जीव वाचवण्यासाठी मारल्या समुद्रात उड्या, तिघांचा मृत्यू…

Massive Fire On Passenger Ship : इंडोनेशियामध्ये (Indonesia) एक मोठी दुर्घटना घडलीये. एका प्रवासी जहाजाला (Ship) आज (20 जुलै) भीषण आग लागली. उत्तर सुलावेसीमधील तालिस बेटाजवळ केएम बार्सिलोना व्हीए जहाजाला ही आग लागली. ही आग एवढी भीषण होती, प्रवाशांनी आपले प्राण वाचवण्यासाठी जहाजातून उड्या मारल्या.

Video : इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये तरुणाने खाल्लं चिकन; व्हिडिओ व्हायरल, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया 

मिळालेल्या माहितीनुसार, आग दुपारी १:३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) लागली. या जहाजात लहान मुलांसह 280 हून अधिक प्रवासी होते. ही आग इतकी भीषण होती की घाबरलेल्या काही प्रवाशांनी आगीपासून वाचण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. काहींनी लाइफ जॅकेट घातले, तर काहींनी त्याशिवायच पाण्यात उड्या घेतल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत जहाजाला लागलेल्या प्रंचड ज्वाळा आणि काळा धूर दिसत आहे.

सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा, छावा संघटना अन् NCP कार्यकर्ते भिडले… 

आगीपासून सुमारे १० ते १५ मीटर अंतरावर पोहणाऱ्या एका महिलेने चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये बोटीतील लोक उड्या मारताना दिसत आहेत.

इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव यंत्रणेने तातडीने बचावकार्य सुरू केले. जवळच्या मासेमारी बोटी आणि नौसेना, तटरक्षक दल यांनी मिळून 150 हून अधिक प्रवाशांना वाचवले. मात्र, या दुर्दैवी घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले, तर काही प्रवाशी अजूनही बेपत्ता असल्याचं प्रांतीय शोध आणि बचाव कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी वेरी अरियांतो यांनी सांगितले.

दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु इलेक्ट्रिकल फॉल्ट, इंधन गळती किंवा इंजनमधील बिघाडामुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube