Morocco Earthquake: विध्वंसक भूकंपात एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू ; जास्त मृत्यू कशामुळे ?

  • Written By: Published:
Morroco

Morocco Earthquake: शक्तिशाली भूकंपाने मोरक्को देश हादरला आहे. या देशात 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. आतापर्यंत 1 हजार 37 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाराशेहून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मोरक्कोला सर्व प्रकारची मदत करण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे.

काहींना वाटले सुट्टी घेतली तर संपले, पण मी संपणाऱ्यातील नाही; पंकजांचा रोख नेमका कोणावर?

शुक्रवारी मध्यरात्री मोरक्कोमध्ये भूंकप झाला आहे. यात सुरुवातीला सहाशेहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु त्यानंतर बचाव कार्यात मृतांची संख्या वाढत गेली आहे. मोरक्कोमधील अजीलाल आणि युसूफिया प्रदेशाबरोबर मरक्केश, अगादीर आणि कॅसाब्लांका प्रदेशामध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


G20 Summit : जगात भारताचा डंका! नवी दिल्ली लीडर्सला मंजुरी; ठरलं आता पर्यंतच सर्वात विस्तृत घोषणापत्र

भूकंपामध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमेरिका जियोलॉजिकल सर्वेनुसार भूकंपाचे केंद्र हे पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या मरक्केश शहरापासून 71 किलोमीटर दूर आहे. येथील स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले आहेत. मुख्य भूकंपानंतरही काही धक्के ही 4. 9 रेश्टर स्केल मोजण्यात आले आहे.

सर्वाधिक नुकसान हे शहराजवळ असलेल्या जुन्या वस्त्यांमध्ये झाला आहे. मोरक्कोतील नागरिकांनी त्याचे व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात इमारती कोसळल्यानंतर धुळींचे लोट उसळल्याचे दिसत आहे. मरक्केश येथे एेतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटक हे जीव वाचविण्यासाठी पळापळ करत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

Tags

follow us