कारगिल युद्धावेळी आमच्याकडून शांतता कराराचं उल्लंघन; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची जाहीर कबुली

कारगिल युद्धावेळी आमच्याकडून शांतता कराराचं उल्लंघन; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची जाहीर कबुली

Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मोठा खुलासा केला आहे. १९९९ मध्ये पाकिस्तानने भारतासोबतच्या शांतता कराराचे उल्लंघन केलं यांची त्यांनी थेट कबुलीच दिलीय. (Pakistan) पाकिस्तानच्या पहिल्या अणुचाचणीला २६ वर्षे पूर्ण झाल्यानिमीत्त पक्षाच्या आयोजीत बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानच्या अडचणीत पुन्हा वाढ, सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय

पाच न्यूक्लिअर टेस्ट

नवाज शरीफ आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात 21 फेब्रुवारी 1999 रोजी झालेल्या लाहोर घोषणापत्रावर शरीफ यांनी भारतासोबत चर्चा केली होती. पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी पाच न्यूक्लिअर टेस्ट केल्या. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तेथे आले आणि त्यांनी आमच्यासोबत करार केला. मात्र, त्या कराराचं आम्ही उल्लंघन केलं. ती आमची मोठी चूक होती, असं नवाज शरीफ म्हणाले आहेत.

स्वाक्षरी होताच भारतात घुसखोरी

‘लाहोर घोषणा’ करारावर नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी २१ फेब्रुवारी १९९९ मध्ये स्वाक्षरी केली होती. याअंतर्ग दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थिरतेसाठी प्रयत्न केले जाणार होते. पण, करारावर स्वाक्षरी होताच पाकिस्तानच्या सैन्याने भारतात घुसखोरी केली होती. जम्मू आणि काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात पाकिस्तान सैन्य आलं होतं. त्यामुळे कारगिल युद्ध घडलं.

दबावानंतरही आपण अणुचाचण्या केल्या
‘राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचण्या करण्यापासून रोखण्यासाठी पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. पण मी नकार दिला. माजी पंतप्रधान इम्रान खान हे माझ्या जागेवर असते तर त्यांनी क्लिंटन यांचा प्रस्ताव स्वीकारला असता अशा शब्दांत शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली. तसंच, अमेरिकेच्या दबावानंतरही आपण अणुचाचण्या कशा केल्या हे सांगत खान यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube