बिलावल यांच्या भारत भेटीपूर्वीचं पाकिस्तानात विरोध; इम्रानची पार्टी म्हणाली ही तर…
Bilawal Bhutto : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र याआधीच पाकिस्तानातील राजकारण तापले आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यापूर्वी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच बिलावल यांच्या भारतभेटीला आंतरराष्ट्रीय अजेंड्याचा भाग म्हणून वर्णन करण्यात आले आहे.
बिलावल भुट्टो यांच्या भारत दौऱ्याला विरोध करताना पीटीआयचे ज्येष्ठ नेते फवाद चौधरी म्हणाले की, भुट्टो यांची भारत भेट म्हणजे काश्मिरींच्या बलिदानाचा अपमान होईल. भुट्टो अशा वेळी भारतात जात आहेत जेव्हा दोन्ही देशांमधील संवाद पूर्णपणे बंद आहे आणि आता जम्मू-काश्मीरला ‘विशेष राज्य’चा दर्जाही नाही.
राज्यपाल असताना का गप्प राहिले; अमित शाहांचा मलिकांवर पलटवार
विशेष म्हणजे अलीकडच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा मंत्री भारतीय भूमीवर पाऊल ठेवणार आहे. भारत दौऱ्यावर आलेले बिलावल भुट्टो शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत सहभागी होणार आहेत.
गुरुवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, बिलावल भुट्टो भारताला भेट देणार आहेत. यावर पीटीआय नेत्याने सांगितले की, काश्मीरचा मुद्दा बाजूला ठेवताना भारतासोबत सहकार्याला प्राधान्य देणे हा आंतरराष्ट्रीय अजेंड्याचा भाग आहे.
‘जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला, आरक्षण दिले नाहीतर मुख्यमंत्र्यांना…’ मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
पाकिस्तान अलीकडच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत भारताचे सहकार्य पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. याआधीही पाकिस्तानकडून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे म्हटले होते. आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या भारत दौऱ्यालाही याच्याशी जोडले जात आहे.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद (CFM) 4-5 मे 2023 रोजी गोवा, भारत येथे होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात येत आहेत.