Pakistan : इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; आज कधीही होऊ शकते अटक

Pakistan : इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; आज कधीही होऊ शकते अटक

Imran Khan Arrest :  पाकिस्तानमध्ये ( Pakistan )  पुन्हा एकदा जोरदार हंगामा सुरु आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan )  हे आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सोमवारी आपल्या हजारो समर्थकांसह मोर्चा काढला होता. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांची एक तुकडी आपल्या हेलीकॉप्टरने आली होती. परंतु बरोबर याच वेळी इम्रान खान आपल्या हजारो समर्थकांसह रस्त्यावर आंदोलनासाठी उतरले.

यावेळी 70 वर्षीय इम्रान खान यांच्या ताफ्यावर त्यांच्या समर्थकांनी गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या उधळल्या. त्यांनंतर इम्रान खान आपल्या  तहरीक-ए-इंसाफ या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. यावेळी इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांची एक तुकडी विशेष हेलिकॉप्टरने त्यांच्या घरी आली होती. नेमके त्याच वेळी इम्रान खान हे रॅलीसाठी बाहेर पडले. त्यांच्यावर एका महिला जज यांना धमकावणे तसेच न्यायालयात हजर न राहणे या कारणावरुन दोन अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत. त्यामुळे इम्रान खान यांना आज कधीही अटक होऊ शकते.

गुजरातमध्ये H3N2 विषाणू ठरला घातक, वडोदरा शहरात पहिला मृत्यू

दरम्यान इम्रान खान यांच्यावर जजला धमकावल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते शाहबाज गिल यांना पोलिसांनी अटक केली होती. शाहबाज यांची रिमांड वाढवण्याची पोलिसांची मागणी जज जेबा चौधरी यांनी मंजूर केली होती. यावरुन इम्रान खान एका रॅलीमध्ये चांगलेच भडकले होते. शाहबाजला जेलमध्ये टॉर्चर केले जात होते हे जेबाला माहिती होते. तरी सुद्धा त्याला जामीन मंजूर केला नाही. यावरुन इम्रान यांनी जेबाला बघून घेईन, अशी धमकी दिली होती. यावरुन इम्रान यांच्यावर दहशतवादी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

तुम्हीच कानडी बोला, मी हिंदी बोलणार नाही; कर्नाटकात रिक्षाचालकाची दादागिरी

इम्रान खान यांच्यावर फसवणुकीच गुन्हा देखील दाखल झालेला आहे. इम्रान हे पंतप्रधान असताना त्यांना 14 कोटींचे गिफ्ट मिळाले होते. याला त्यांनी सरकारकडे जमा देखील केले होते. परंतु त्यांच्यावर आरोप आहे की, याला त्यांनी स्वस्त किंमतीमध्ये खरेदी केले व बाजारात जास्त दरांमध्ये ते विकले. यावरुनही त्यांच्यावर केस सुरु आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube