विदेशातही मोदींचा डंका! ‘मन की बात’ ऐकत वृद्ध महिलेने मोदींच्या फोटोला…
PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat)रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित झाला. विशेष म्हणजे 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाने 100 भाग पूर्ण केले. 2014 मध्ये सरकार अस्तित्वात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या शतकपूर्तीनिमित्त जगभरात अनेक ठिकाणी हा कार्यक्रम ऐकला व पहिला गेला. यातच न्यूझीलंडमध्ये एका शंभर वर्षीय वृद्ध महिलेने मोदींचे भाषण ऐकले आणि त्यांच्या फोटोला हात लावत त्यांना आशीर्वाद दिले.
पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करत असतात. आज या कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित झाला. भारतात तर याचे प्रसारण मोठ्या थाटामाटात झाले तर दुसरीकडे विदेशातही मोदींची लोकप्रियता पुन्हा एकदा झळकल्याचे पाहायला मिळाले.
#WATCH | New Zealand | 100-year-old Ramben blesses PM Modi, as she along with other members of the Indian diaspora, listens to the 100th episode of #MannKiBaat, in Auckland. pic.twitter.com/zR0JEmvCoH
— ANI (@ANI) April 30, 2023
100 व्या पर्वाच्या ऐतिहासिक प्रसंगी हा कार्यक्रम देशातच नाही तर परदेशातही प्रसारित करण्यात आला. न्यूझीलंडमधील परदेशी भारतीयांनीही मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग ऐकला. यावेळी 100 वर्षीय रामबेन यांनी मोदींचा हा कार्यक्रम ऐकला त्यांचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.
‘मन की बात’ सुरु अन् नारायण राणेंना लागली ‘डुलकी’
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग ऐकण्यासाठी न्यूझीलंडमध्ये एका हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी थेट स्क्रीनिंगद्वारे पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या ठिकाणी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय जमा झाले होते. कार्यक्रमानंतर 100 वर्षांच्या रामबेन यांनी पंतप्रधान मोदींना आशीर्वाद दिले. रामबेन यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोवर हात फिरवून आशीर्वाद दिला.