नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळन, 14 आंदोलनकांचा मृत्यू

Nepal Protest Gen Z : नेपाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी आज सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये. नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीये. या बंदीविरोधात नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरूणांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनाला हिंसक वळन लागलं असून 14 आंदोलनकांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकारच्या रस्त्यावर उतरले आहेत. आज आंदोलकांनी नेपाळच्या संसदेत प्रवेश केला. (Nepal) परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे.
सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. त्याचवेळी, पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांच्या मते, 12 हजारांहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केला.