Video : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न! युक्रेनने कट रचल्याचा आरोप

Video : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न! युक्रेनने कट रचल्याचा आरोप

Ukraine Drone Attack At Kremlin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin)यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. असा आरोप खुद्द रशियानेच केला आहे. युक्रेनने क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं रशियाचं म्हणणं आहे. क्रेमलिनने याला दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे.

राजीनामा सत्र ; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांचाही राजीनामा

क्रेमलिनने एका निवेदनात म्हटले आहे की, दोन मानवरहित वाहने (ड्रोन्स) रशियाच्या दिशेने पाठवण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतिन हे त्यांचे लक्ष्य होते. ड्रोन निकामी केले आहेत. आम्ही हे नियोजित दहशतवादी कृत्य मानतो. रशियन फेडरेशनच्या अध्यक्षांना मारण्याचा एक प्रयत्न होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रशियाने म्हटले की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कामाच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही. ते नेहमीप्रमाणे चालू राहणार आहे. आम्ही याचा बदला घेण्यासाठी कारवाई करणार आहोत. सध्याची परिस्थिती पाहता हे योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी युक्रेनकडून अद्यापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

युक्रेनने ‘दहशतवाद्यां’प्रमाणे रशियन राष्ट्राध्यक्षांना मारण्यासाठी ड्रोन पाठवल्याचा आरोप, रशियन सरकारकडून करण्यात आला आहे. युक्रेनला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असा इशारा रशियाने दिला आहे. क्रेमलिनने बुधवारी 3 मे रोजी सांगितले की, त्यांनी युक्रेनने लॉन्च केलेले दोन ड्रोन पाडले आहेत.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची हत्या करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून राष्ट्राध्यक्षांच्या क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युक्रेनवर केला आहे. या हल्ल्यामध्ये पुतिन यांना कसलीही इजा झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री रशियाच्या अध्यक्षांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रेमलिनचे म्हणणे आहे की, 9 मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या परेडच्या अगोदर हल्ल्याचे नियोजन करण्यात आले आहे. हल्ल्यानंतरही 9 मे रोजी होणारी विजय दिन परेड नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे रशियन सरकारकडून सांगण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube