Same Sex marriage Law In Thailand : गेल्या वर्षी थायलंडमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता (Same Sex marriage) दिली होती. त्यानंतर आता देशभरात या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलीय. दक्षिण-पूर्व आशियामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करणारा थायलंड हा पहिला देश ठरला. थायलंडमध्ये (Thailand) आज मोठ्या संख्येने समलिंगी जोडप्यांनी सामूहिक विवाहात भाग घेतला. विवाहाला कायदेशीर (Marriage Act) मान्यता मिळाल्याने समलिंगी जोडप्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! पुणे विद्यापीठात नवा अभ्यासक्रम, मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे
समलिंगी विवाह कायद्याला मान्यता मिळाली, या आनंदात आज संपूर्ण थायलंडमध्ये लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. समलैंगिक विवाह कायद्याची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा मोठा विजय असल्याचं म्हटलंय. थायलंडमधील LGBTQ+ समुदाय एका दशकाहून अधिक काळ समलिंगी विवाहाची मागणी (Same Sex marriage Law) करत होते. थायलंडच्या संसदेने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या विधेयकाला राजाने मंजुरी दिली. या कायद्यामुळे समलिंगी जोडप्यांना आर्थिक, कायदेशीर आणि वैद्यकीय अधिकार मिळाले आहेत. हे जोडपं एक मूल दत्तक घेण्यासही सक्षम असणार आहे.
सर्वात आनंदाचा दिवस
हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, असं पिसिट सिरिहिरांचाई यांनी म्हटलंय. त्यांनी देखील समलिंगी पुरुषाशी लग्न केलंय. ते म्हणाले की, आम्हाला बरेच दिवस जे करायचे होते, ते आम्ही शेवटी करू शकलो. आता आम्ही एक संपूर्ण कुटुंब आहोत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सामूहिक समलिंगी विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांनी म्हटलं की, हा विवाह कायदा थाई समाजाच्या लैंगिक विविधतेच्या व्यापक जाणीवेची सुरुवात आहे. जात-धर्माचा विचार न करता सर्वांना सामावून घेण्याचा आमचा हा उपक्रम आहे. सर्वांना समान हक्क आणि सन्मान मिळण्याचा हक्क आहे.
सायंकाळी 7.59 वाजताचे रहस्य उलगडले, स्टार प्लसवरील ‘जादू तेरी नजर’ मालिकेची पहिली झलक दिसली
थायलंडच्या रेनबो स्काय असोसिएशनचे अध्यक्ष आणि वकील किटिनून दरमधज म्हणाले की, हे जगासाठी एक मॉडेल असू शकते, कारण आता आपल्याकडे थायलंड एक मॉडेल म्हणून आहे. थायलंडमध्ये खरी वैवाहिक समानता असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर… प्यू रिसर्च सेंटरच्या मते, सध्या जगभरातील 30 हून अधिक देशांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे. या कायद्यातील अंमलबजावणी करणारे आशियातील तीनच देश आहेत. 2019 मध्ये प्रथम तैवानने आणि नंतर नेपाळने याला मान्यता दिली. आता थायलंड हा तिसरा देश बनलाय. थायलंडमध्ये ट्रान्सजेंडर लोकांना सध्या त्यांची लिंग ओळख बदलण्याची परवानगी नाही. एशिया पॅसिफिक ट्रान्सजेंडर नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये अंदाजे 314,000 ट्रान्स लोक राहतात.