Toshiba : तोशिबा कंपनीचा कर्मचाऱ्यांना झटका; 4 हजार कर्मचाऱ्यांची कपात…
Toshiba : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्गज तोशिबा (Toshiba) कंपनीकडून एक मोठी घोषणा करण्यात आलीयं. कंपनीतील 4 हजार घरगुती कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. तोशिबा कंपनीचे नवे मालक जपान इंडस्ट्रीयल पार्टनर्सकडून (Japan Industrial Partners) हा निर्णय घेण्यात आलायं. कंपनी पुन्हा रुळावर आणण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
BREAKING: Japan’s Toshiba says to cut up to 4,000 jobs
READ: https://t.co/lUrHoZg8Br pic.twitter.com/0LIU07uMKx
— Insider Paper (@TheInsiderPaper) May 16, 2024
तोशिबाचे नवीन मालक जपान इंडस्ट्रियल पार्टनर्स (JIP) यांच्या नेतृत्वाखालील हा निर्णय घेण्यात आला असून JIP ने डिसेंबरमध्ये कंपनी $13 बिलियनमध्ये विकत घेतली होती, त्यानंतर तोशिबाला स्टॉक मार्केटमधून काढून टाकण्यात आले. कंपनीत सुरु असलेले घोटाळे आणि अंतर्गत गोंधळांमुळे हा निर्णय घेण्यात आलायं.
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल
यासोबतच तोशिबा कंपनीचं मुख्य कार्यालय टोकियामधून आता कावासकी इथं हलवण्यात आल्याचाही निर्णय घेण्यात आलायं. पुढील तीन वर्षांत कंपनीने 10 टक्के नफा गाठण्याचं लक्ष समोर ठेवलं असून तोशिबाचा JIP चा प्रयोग खाजगी कंपन्यांच्या तुलनेत एक मोठी परिक्षा मानली जात आहे. जपानमध्ये सध्या खाजगी इक्विटी कंपन्यांचे स्वागत केले जात असून ज्या कंपन्यांना व्यवसाय विकायचे आहेत त्यांना नवीन मालक शोधण्यात अडचणी येत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
Sonu Sood: 17 कोटी रुपयांच्या इंजेक्शनच्या मदतीसाठी धावला सोनू सूद; नेटकऱ्यांकडून कौतुक
दरम्यान, तोशिबा कंपनीच्या नव्या मालकाकडून घेण्यात आलेला निर्णय हा मोठ्या बदलांचे लक्षण असल्याचं बोललं जात आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम जपानमधील इतर कंपन्यांमध्येही दिसून येत आहे. Including photocopier manufacturer Konica Minolta, cosmetics firm Shiseido, and electronics company Omron, यांसारख्या कंपन्यांनीही अलीकडे कपात करण्याचा निर्णय घेतला होता.