Turkey Syria Earthquake : आत्तापर्यंत 21 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Turkey Syria Earthquake : आत्तापर्यंत 21 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामध्ये आत्तापर्यंत 21 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूकंप झाल्यापासून प्रशासनाकडून मदत बचावकार्यात गुंतलं आहे. त्यामुळे अनेक भागांत मदत पोहोचलेली नसल्याचंही समोर येतंय.

भूकंपाच्या संकटात सापडलेल्या तुर्की देशाला भारताकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. भारताने NDRF च्या तीन पथकांसह मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं

भारतीय बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. NDRF ने गुरुवारी (9 फेब्रुवारी) सहा वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पटोले-थोरात वादाची हायकमांडकडून दखल, प्रभारी पाटील १२ तारखेला मुंबई दौऱ्यावर

भारतीय NDRF कडून श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यादरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. NDRF ने चिमुकलीला वाचवल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

या व्हिडीओमध्ये एक चिमुकली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत आहे. डॉक्टर चिमुकलीच्या आरोग्याची तपासणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बचाव पथक मुलीला अलगद स्ट्रेचरवर घेऊन जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या ही 21,000 च्या पुढे गेली आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे. आधी जपानमधील फुकूशिमा आपत्तीमधील मृतांचा आकडा मोठा होता. तुर्की-सीरियातील भूकंपामुळे झालेल्या मृतांचा आकडा फुकूशिमामध्ये झालेल्या मृतांच्या संख्येपेक्षाही जास्त असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube