भलतंच की! मतदान न करण्याचा निर्णय लग्न तुटण्यापर्यंत आला; महिलेची पोस्ट होतेय व्हायरल..

भलतंच की! मतदान न करण्याचा निर्णय लग्न तुटण्यापर्यंत आला; महिलेची पोस्ट होतेय व्हायरल..

US President Elections 2024 : अमेरिकेत कुणाचं सरकार येणार हे आता जवळपास (US Elections 2024) स्पष्ट झालं आहे. रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) बहुमताचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे निवडणुकीबाबत सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक खास पोस्ट व्हायरल होत आहेत. एका २६ वर्षीय महिलेने तर होणाऱ्या पतीशी संबंधच तोडून टाकण्याची धमकी दिली होती. याचं कारणही खास आहे. या महाशयांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून महिलेने त्याच्याशी लग्नगाठ बांधण्याआधीच आपला रस्ता वेगळा करण्याचा इशारा दिला होता.

संबंधित महिलेने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म Reddit वर हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. या महिलेने सांगितल्यानुसार ती फ्लोरिडा येथील रहिवासी आहे. तर तिच्या होणाऱ्या पतीचं म्हणणं आहे की मला निवडणुकीतील कोणताच उमेदवार पसंत नव्हता. म्हणून मतदान करणार नाही. आमची विचारधारा समान आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही की तो मतदानाच्या बाबतीत इतका निष्काळजी कसा असू शकतो.

यानंतर सोशल मीडियावरील महिलेच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांनी तिचं समर्थन केलं. तर काहींचं म्हणणं आहे की या कारणामुळे होणाऱ्या पतीथी थेट संबंधच तोडून टाकणं चुकीचं आहे. एका युजरने म्हटलं तुम्ही त्याची प्रतिक्रिया अथवा त्याच्या काय आवडीनिवडी आहेत यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. मतदान करण्याचा निर्णय वैयक्तिक आहे. जर तुम्ही याला तुमच्यातील एखादी अट मानत असाल हे चुकीचं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय दिसताच क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजी; बिटकॉइनने प्रथमच $75,000 चा टप्पा ओलांडला

डोनाल्ड ट्रम्पना बहुमत, कमला हॅरिस पराभूत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अजून मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान अमेरिकी मिडिया आउटलेट फॉक्स न्यूजने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या विजयाची घोषणा देखील केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांचा सात स्विंग स्टेटसवर सर्वाधिक भर होता. या सर्व राज्यांत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी २७० मते आवश्यक असतात. कारण येथे एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेज आहेत आणि विजयी होण्यासाठी २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल मतांची गरज असते.

सध्याच्या परिस्थितीत अजून ३५ मतांची मोजणी होणे बाकी आहे. या सर्व ठिकाणी ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. जर अशीच स्थिती कायम राहिली तर ट्रम्प यांना एकूण ३१२ मते मिळू शकतात. कमला हॅरिस मात्र २२६ मतांवरच थांबू शकतात. या निवडणुकीच्या निकालांवर जगभरातील देशांची नजर आहे. सध्यच्या परिस्थितीत तर ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न?, फ्लोरिडातील गोल्फ क्लबबाहेर गोळीबार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube