बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, युवा नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर अशांतता ,पत्रकारांना मारहाण
Bangladesh Violence : भारताचा शेजारील राष्ट्र बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिस्पर्धी
Bangladesh Violence : भारताचा शेजारील राष्ट्र बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिस्पर्धी नेते शरीफ उस्मान हादी यांचा गुरुवारी सिंगापूरमध्ये निधन झाल्याने बांगलादेशात अचानक हिंसाचार सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. इन्कलाब मंचाकडून बंगादेशात हिंसाचार सुरु करण्यात आला असून या हिंसाचारात ढाकामधील बांगलादेशी वृत्तपत्रे असलेल्या इमारतींची तोडफोड करत काही पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर बांगलादेशातील अनेक भागात हिंसाचार सुरु आहे.
प्रकरण काय आहे?
12 डिसेंबर रोजी निवडणूक प्रचारादरम्यान युवा नेते उस्मान हादी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर त्यांना ढाका (Dhaka) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हादींची (Bangladesh Violence) प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सिंगापूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले. अनेक दिवस झुंज दिल्यानंतर, उस्मान हादी यांचा गुरुवारी रुग्णालयात मृत्यू झाला. सिंगापूरच्या (Singapore) परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या मृत्यूची पुष्टी करताच, इन्कलाब मंचच्या निदर्शकांनी तोडफोड केली.
VIDEO | Dhaka, Bangladesh: Daily Star newspaper building was attacked in Dhaka following death of Sharif Osman Hadi, a prominent leader of the July Uprising and a spokesperson of the Inqilab Manch who was shot last week. Protests erupted in Dhaka as soon as the news of his death… pic.twitter.com/wJSfbc0E01
— Press Trust of India (@PTI_News) December 18, 2025
अवामी लीग कार्यालय जाळले
निदर्शकांनी अवामी लीग कार्यालय जाळले. त्यांनी शेख हसीनाचे वडील मुजीबुर रहमान यांच्या घरालाही आग लावली. यापूर्वी, निदर्शकांनी शेख हसीनाच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. चटगांवमधील भारतीय उच्चायुक्तालयालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखली.
मकर यासह 4 राशींसाठी आज धन योग, होणार फायदा; जाणून घ्या19 डिसेंबर सर्व 12 राशींसाठी कसा राहणार?
तर दुसरीकडे हादी यांच्या निधनानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी राष्ट्राला संदेश देत लोकांना संयम राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. तसेच हादी यांच्या हत्या प्रकरणात असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
