म्यानमारमध्ये हिंसाचार; परराष्ट्र मंत्रालयाने जारी केला अलर्ट

  • Written By: Published:
Myanmar Violence

Myanmar Violence : मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) आणि म्यानमारमधील सैनिकांमध्ये काही दिवसांपासून चकमक (Myanmar Violence) सुरु आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. भारतीय नागरिकांनी म्यानमारला जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “म्यानमारमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना म्यानमारमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याशिवाय जे लोक आधीच म्यानमारमध्ये राहत आहेत त्यांनी हिंसाचार प्रभावित भागात जाऊ नये. रस्त्याने आंतरराज्य प्रवास देखील टाळावा.”

National Herald Case : गांधी कुटुंबाला अडचणीत आणणारं नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?

मंत्रालयाचे प्रवक्ते अरंडीम बागची यांनी हे निवेदन सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, म्यानमारमध्ये राहणाऱ्या लोकांना भारतीय दूतावासात फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरं तर, अलीकडेच पीडीएफने म्यानमारच्या चिन राज्यावर हल्ला केला होता. प्रत्युत्तर म्हणून म्यानमारच्या लष्कराने प्रत्युत्तर दिले. चिनमधील हल्ल्यामुळे अनेक सैनिकही भारतात पळून गेले.

म्यानमारचे सैनिक मिझोरामला पळून गेले
मिझोराममध्ये पळून गेलेल्या म्यानमारच्या 29 सैनिकांना रविवारी (19 नोव्हेंबर) त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. पीडीएफच्या लष्करी दलांनी छावण्या ताब्यात घेतल्यानंतर भारतात आलेल्या म्यानमार लष्कराच्या 70 जवानांना आतापर्यंत त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 750 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

दरम्यान, वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, सध्या भारत-म्यानमार भारत सीमेवरील परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि बुधवारपासून (15 नोव्हेंबर) कोणत्याही चकमकीचे वृत्त नाही.

Tags

follow us