छोट्याशा उंदारला घाबरले अन्…; पावरफुल पुतिन यांच्या कधीच जगासमोर न आलेल्या गोष्टी वाचल्या का?
Vladimir Putin भारत दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांच्या समोर न आलेल्या गोष्टी समोर आल्या. त्यात उंदारामुळे त्यांच्या आयुष्यात झालेला बदल समोर आला
Vladimir Putin life lessons from Rat Putin’s never before seen stories : रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन (Vladimir Putin) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यादरम्यान त्यांच्या कधीच जगासमोर न आलेल्या गोष्टी समोर येत आहेत. त्यात अशीच एक गोष्ट समोर आली आहे. ज्यामध्ये छोट्याशा उंदारला घाबरल्यानंतर पुतीन यांच्या आयुष्यात कसा बदल झाला हे समोर आलं आहे?
Good News : वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार; गडकरींची संसदेत मोठी घोषणा….
1960 च्या दशकातील गोष्ट आहे. गरिबीमध्ये वाढलेला एक लहान मुलगा त्याच्या आई-वडिलांसह एका जुन्या धोकादायक इमारतीमध्ये राहत होता. ज्याठिकाणी ना अंघोळीची सोय होती ना गरम पाणी. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या त्याच्या घरी जाण्यासाठी त्याला उंदरांमधून ( Rat) जावं लागत होतं. तो काठीने त्या उंदरांना पळवून लावी आणि घरी पोहचत असे. एके दिवशी भला मोठा उंदीर होता. या मुलाने त्याला हाकलावून लावले तेव्हा तो कोपऱ्यामध्ये जाऊन बसला. तेथून तो कुठेही जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्या उंदराने या मुलावर हल्ला केला. मुलगा घाबरून पळून गेला. (Vladimir Putin)
समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अडकले विवाहबंधनात
या घटनेने या मुलाला आयुष्यभरासाठी धडा शिकवला की, कठीण परिस्थितीमध्ये पळून जाण्याचं मार्ग नसेल तर प्रतिहल्ला करा. हा मुलगा दुसरा-तिसरा कुणी नाही तर रशियाचे पावरफुल राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन (Vladimir Putin) होते. त्यांचं लहानपण लेनीनग्राड म्हणजे आताच्या सेंट पीटर्सबर्ग जीर्ण इमारती आणि युद्धाच्या कठीण परिस्थितीमध्ये गेलं. त्यांचे वडिल व्लादीमीर स्पिरिडोनोविच हे सोव्हियत संघाच्या नौदलामध्ये होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये लेनिनग्राडला 900 दिवस घेरलेले असताना ते युद्धामध्ये लढले होते आणि गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वे कारखान्यामध्ये काम करून जीवन व्यतीत केलं. तर पुतीन यांची आई मारिया कारखान कामगार होती. तर पुतीन यांचे आजोबा स्पिरीडॉन सोव्हिएत संघाचे संस्थापक जोसेफ स्टॅलिन यांचे कूक होते.
Indigo Airline : 434 विमाने, 10,000 क्रू पण तरीही सेवा रद्द; अचानक इंडिगो संकटात का?
पुतीन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 ला लेनीनग्राडच्या अशा रूग्णालयात झाला जेथे मुलं बाहेर पडण्याअगोदरच मरत होते. पुतीन त्यांच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य होते. त्यांच्या मोठ्या भावाचा मृत्यू लहानपणीत आजारपणामुळे झाला होता. दुसऱ्या भावाचा मृत्यू भूकबळी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे झाला होता.
पुतीन बालपणी अगदी नम्र होते. एकदा शेजारच्या मुलाशी त्यांचं भांडण झालं होतं ते मुलं यांच्यापेक्षा ताकदवान होते. ते पुतीनला भारी भरत होते. त्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी पुतीन यांनी ज्युदो शिकले. त्यानंतर त्यांनी मात्र गुंडगिरी, भांडण सुरू केले. जे त्यांच्या रक्तामध्ये भिनलं होतं. पुतीन लहानपणी मुलांशी भांडणं करत ज्यामध्ये ते स्वत: ला स्ट्रीट फायटींग हूलिगन सांगत लहाणपणीच त्यांनी मार्शल आर्ट देखील शिकलं 18 व्या वर्षापर्यंत त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवलं होतं.
‘या’ दिवशी दुबईमध्ये रंगणार नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या “संभवामी युगे युगे” पहिला शो!
अशा प्रकरच्या कठीण परिस्थितीमध्ये वाढलेल्या पुतीन यांना लहानपणापासूनच हेरगिरीवरील कादंबऱ्या वाचायला आवडत होत्या. त्यांना कम्युनिस्ट विचारधारेने प्रेरित झालेल्या पुतीन यांना रशियन गुप्तचर संघटना केजीबीमध्ये जायचे होते. मात्र त्यामध्ये सहजासहजी भरती होत नव्हती.त्यासाठी त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि 1975 मध्ये केजीबीमध्ये भरती झाले. त्यात त्यांनी 1991 पर्यंत सोव्हिएत संघ वेगळा होईपर्यंत लेफ्टनंट कर्नल म्हणून काम पाहिलं.
निवडून दिलं म्हणजे सगळे…, तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंनी फडणवीस सरकारला सुनावलं
दरम्यान सोव्हिएत संघाच्या पतनामुळे देश आर्थिक संकटात सापडला होता. त्या काळात पुतीन यांना अतिरिक्त कमाईसाठी टॅक्सी चालवावी लागली. त्यात ते कधी कार तर कधी खासगी ड्रायव्हर म्हणून काम पाहत होते. त्या काळात टॅक्सी देखील कमी होत्या. अनेक लोक उदरनिर्वाहासाठी लोकांना टॅक्सी चालवायला देत होते.काही लोक तर अॅम्ब्युलन्सला देखील टॅक्सी म्हणून चालवत.
अतिवृष्टीग्रस्तांना 1278 अनुदान वितरीत; आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी दिली माहिती
1990 च्या दशकाच्या सुरूवातीला पुतीन यांना लेनीनग्राडचे मेयर अनातोली सोबचक यांच्या कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते डेप्युटी मेयर झाले. 1994 ते 1996 पर्यंत ते सेंट पीटर्सबर्गमध्ये अनेक पदांवर काम केलं.1996 मध्ये त्यांना मॉस्कोमध्ये जाऊन तत्कालीन राष्ट्रपती बोरिस येल्तसिन यांच्या प्रशासनामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1999 मध्ये ते काही काळासाठी मंत्री राहिले. येल्तसिन यांच्या राजीनाम्यानंतर पुतीन यांना कार्यवाहू राष्ट्रपती करण्यात आलं. त्यानंतरच्या मार्च 2000 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना औपचारिकपणे राष्ट्रपती करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आजपर्यंत ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. 2008 ते 2012 दरम्यान ते रशियाचे पंतप्रधान देखील होते.
बांगलादेश हादरला! ढाकामध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
पुतीन हे असं व्यक्तीमत्व आहे. ज्यांनी टॅक्सीच्या स्टेअरिंगपासून ते केजीबीच्या गुप्त फाईल्स आणि नंतर क्रेमलिनच्या सत्तेच्या उंचीपर्यंतटचा प्रवास केला आहे. कठोर शासन, रहस्यमय खासगी आयुष्य आणि मजबूत राजकीय इच्छाशक्ती यासह पुतीन आजही जगातील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त व्यक्ती मानले जातात. त्यांची काहणी फक्त सत्ता नाही ताकद, रहस्य आणि राजकीय प्रतिक मानली जाते.
