Budget 2023 : अर्थसंकल्पाआधीचा “हलवा समारंभ” का साजरा केला जातो ?

  • Written By: Published:
Budget 2023 : अर्थसंकल्पाआधीचा “हलवा समारंभ” का साजरा केला जातो ?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजांची छपाई सुरू झाल्याच्या निमित्ताने अर्थमंत्रालयात ‘हलवा समारंभ’ आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ आयोजित करण्यात आला होता. अर्थसंकल्पापूर्वी हलवा समारंभ साजरा करण्याची परंपरा आहे. बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून हा समारंभ साजरा केला जातो.

का केला जातो हलवा समारंभ ?

परंपरेनुसार हलवा समारंभ दरवर्षी साजरा केला जातो. याचं कारण म्हणजे बजेट तयार करणारे कर्मचारी बजेट सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॉकच्या परिसरात राहतात. संसदेतील अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतरच हे कर्मचारी आपल्या घरी जातात. दोन वर्षांपूर्वीपर्यंत बजेट छपाईचे कामही केवळ नॉर्थ ब्लॉकमध्येच केले जात होते. आता बजेट पूर्णपणे डिजिटल झाले आहे, त्यामुळे आता बजेट डिजिटल स्वरूपात तयार करावे लागणार आहे. त्याची गुप्तता राखण्यासाठी हलवा समारंभानंतरही काही कर्मचारी नॉर्थ ब्लॉकमध्ये राहतील.

भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मिठाई खाण्याने होते. यामुळे बजेटचे काम पूर्ण झाल्यानंतर हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube