ट्रम्पमुळे अमेरिकेची मान शरमेनी खाली; फेडरल आरोपांचा सामना करणारे ठरले पहिले माजी राष्ट्राध्यक्ष

ट्रम्पमुळे अमेरिकेची मान शरमेनी खाली; फेडरल आरोपांचा सामना करणारे ठरले पहिले माजी राष्ट्राध्यक्ष

Donald Trump :  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ट्रम्प यांच्याविरोधात गोपनीय कागदपत्रांशी संबंधित खटला चालवला जाणार आहे. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतरही ट्रम्प यांनी शेकडो वर्गीकृत कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तसेच चुकीची विधानेदेखील त्यांनी केली. ट्रम्प यांच्याविरोधात तपास यंत्रणांनी सात केंद्रीय गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की त्यांना मंगळवारी मियामी फेडरल कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स प्राप्त झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर नॅशनल आर्काइव्हजने त्यांना आणि त्यांच्या टीमला अध्यक्षीय रेकॉर्डशी संबंधित कागदपत्रे परत करण्याची मागणी केली होती. मात्र, अनेक महिन्यांनंतर सुमारे 200 वर्गीकृत कागदपत्रे परत करण्यात आली. FBI ने ऑगस्ट 2022 मध्ये ट्रम्प यांच्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवली, ज्यामध्ये FBI ने 100 हून अधिक गोपनीय कागदपत्रे जप्त केली. ट्रम्प यांच्यावरील एका आरोपात कट रचल्याचा आरोप आहे.

PM मोदींचे OSD झाले देशाच्या अर्थमंत्र्यांचे जावई; चर्चा मात्र सीतारामन कुटुंबीयांच्या साधेपणाची!

त्याचवेळी त्यांच्याविरोधात नवीन गुन्हे दाखल केल्यानंतर ट्रम्प यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, ‘अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांसोबत असे काही घडेल, असे त्यांना कधीच वाटले नव्हते! आजवरच्या सर्व राष्ट्रपतींपैकी सर्वाधिक मते मिळविलेल्या आणि सध्याच्या अध्यक्षांपेक्षा अधिक लोकप्रिय असलेल्या व्यक्तीबाबत हे घडत आहे. मी निर्दोष आहे.

मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. एक देश म्हणून आमची झपाट्याने घसरण होत आहे, पण एकत्र येऊन आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू. डोनाल्ड ट्रम्प हे 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही दावेदार आहेत. मात्र, यापूर्वी लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात त्याला दंड ठोठावण्यात आला होता. आता तो गोपनीय कागदपत्रांशी संबंधित प्रकरणातही अडकत असल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube