टॅलेंटेड अर्थतज्ज्ञ, अमेरिका-यु्क्रेन डीलही घडवली.. युक्रेनच्या नव्या महिला पंतप्रधान कोण?

टॅलेंटेड अर्थतज्ज्ञ, अमेरिका-यु्क्रेन डीलही घडवली.. युक्रेनच्या नव्या महिला पंतप्रधान कोण?

Ukraine new Prime Minister Yuliia Svyrydenko Appointed by Zelenskyy :  रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजून थांबलेलं (Russia Ukraine War) नाही. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या आगीत दोन्ही देशांचं अतोनात नुकसान झालं आहे. अमेरिका आणि नाटो देशही या युद्धात अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. या देशांचा युक्रेनला पाठिंबा असल्याने युद्ध लांबलं आहे. यातच आता युक्रेनमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. देशाच्या पंतप्रधानपदी युलिया स्वीरिडेन्को (Yuliia Svyrydenko) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युलिया या युक्रेनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. या युलिया स्वीरीडेन्को नेमक्या कोण आहेत? राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी त्यांच्यावरच विश्वास का दाखवला? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली याचा थोडक्यात आढावा घेऊ या..

युक्रेनच्या महिला पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. युक्रेनचे आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले डेनिस श्मीहाल यांना संरक्षण मंत्री बनवण्यात आले आहे.

कोण आहेत यूलिया?

युलियांचा जन्म 25 डिसेंबर 1985 रोजी चेर्निहिव्ह शहरात झाला. सरकारी कुटुंबातून आलेल्या युलियांनी कीव नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ट्रेड अँड इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आणि नंतर जर्मनी आणि स्वीडनमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे धडे घेतले. विशेष म्हणजे त्यांना इंग्रजी आणि चिनी दोन्ही भाषांचे चांगले ज्ञान आहे. 2011 मध्ये युलिया यांनी चीनमधील युक्रेनियन शहराचे एकमेव अधिकृत प्रतिनिधी कार्यालय असलेल्या वूशी शहरात चेर्निहिव्हचे कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय राजकीय प्रवासाची सुरुवात होती. 2015 मध्ये चेर्निहिव्ह ओब्लास्टच्या आर्थिक विकास विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

अमेरिकेचा पाकिस्तानला दणका! TRF दहशतवादी संघटना घोषित; पहलगाम हल्ल्याची घेतली होती जबाबदारी

2018 मध्ये चेर्निहिव्हचे कार्यवाहक राज्यपाल पद त्यांनी सांभाळले. 2020 मध्ये पूर्व युक्रेनमधील संकटांवेळी त्रिपक्षीय संपर्क गटातील सामाजिक-आर्थिक उपसमूहात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्यावर सोपवली होती. डिसेंबर 2020 मध्ये राष्ट्रपती कार्यालयाचे उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये युक्रेनियन संसदेने त्यांना पहिले उपपंतप्रधान आणि आर्थिक विकास मंत्री म्हणून निवडले होते.

अमेरिकेशी करार करण्यात मोठा वाटा

युलिया स्वीर्डेन्को यांचे नाव अलिकडेच अमेरिकेसोबत केलेल्या खनिज करारामुळे चर्चेत आले. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अमेरिका आणि युक्रेनमधील संबंध थंडावले असताना हा करार झाला. युलिया यांनी हुशारीने तयार केलेल्या या करारात युक्रेनने आपल्या संसाधनांवर आणि पायाभूत सुविधांवर पूर्ण नियंत्रण तर ठेवलेच पण अमेरिकेकडून आर्थिक आणि धोरणात्मक पाठिंबाही मिळवला.

विश्वासू चेहरा, जबाबदार अधिकारी

सरकारमधील कडक पण धोरणात्मकदृष्ट्या स्पष्ट अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रपती कार्यालयातील त्या एक विश्वासू व्यक्ती होत्या. तसेच पाश्चात्य देशांशी संपर्कातील एक मजबूत दुवा म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांनी IMF, EU आणि जागतिक बँक सारख्या संस्थांसोबत आर्थिक सहकार्यासाठी मुख्य वाटाघाटी देखील केल्या आहेत. 2023 मध्ये टाइम मासिकाने त्यांचा समावेश जगातील 100 उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत केला होता.

भारतात विकलं जाणार नॉनव्हेज दूध; अमेरिका अन् भारतातील डिल नेमकी काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube