झेलेन्स्कींची खुर्ची धोक्यात! युक्रेनी एजन्सीने उघडली भ्रष्टाचाराची फाइल; युद्धग्रस्त देशात काय घडतंय?

Volodymyr Zelenskyy News : युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की तपास (Volodymyr Zelenskyy) यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. राष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंध ब्युरो आणि विशेष भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्यालयाने काही पुरावे गोळा केले आहेत ज्यामुळे झेलेन्स्की यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंत्रणांनी झेलेन्स्की यांच्या फ्लॅटमधून त्यांचे सहकारी तिमूर मिंडिच यांच्या संभाषणाचा एक टेप रेकॉर्ड केला आहे. मिंडिच एक उद्योजक आहेत आणि क्वार्टल 95 कंपनीचे सहमालक आहेत. ही एक यु्क्रेनी प्रॉडक्शन कंपनी आहे. या कंपनीची स्थापना झेलेन्स्की यांनी राष्ट्रपती बनण्याआधी केली होती.
युक्रेनी मीडिया प्रावदानुसार एनबीयू आणि एसएपीओच्या कर्मचाऱ्यांनी टेपच्या बाबतीत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, या रेकॉर्डिंगमध्ये राष्ट्रपती झेलेन्स्की स्वतः सहभागी असू शकतात असे सांगितले जात आहे. हा टेप त्याच फ्लॅटमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता ज्या ठिकाणी झेलेन्स्की यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या संदर्भात टेप तयार करण्यात आला असला तरी यात भ्रष्ट देवाणघेवाणी संदर्भात काही चर्चा आहे किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या व्यतिरिक्त तपासात अजून तरी झेलेन्स्की यांचं नाव आलेलं नाही.
अमेरिकेची भारतासह काही देशांना उघड धमकी; रशियाकडून तेल खरेदी करू नका, अन्यथा
मिंडीचला नोटीस धाडण्याची तयारी
प्रावदाने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की एनएबीयू आणि एसएपीओ मिंडीच यांच्या विरुद्ध नोटीसची तयारी करत आहेत. भ्रष्टाचार विरोधी यंत्रणांच्या विरोधात राष्ट्रपतींच्या प्रतिरोधालाही या प्रकरणाशी जोडण्यात येत आहे. याच कारणामुळे एजन्सींविरोधात रस्त्यांवर आंदोलन करण्यात आले होते.
तपास यंत्रणांनी ज्या प्रकरणात मिंडीच यांची रेकॉर्डिंग केली आहे त्या प्रकरणात अजून तरी झेलेन्स्की यांचं नाव समोर आलेलं नाही. पण जर यात मिंडीच अडकले तर या प्रकरणाचा संबंध झेलेन्स्की यांच्याशीही निघू शकतो असे मानले जात आहे. खरंतर मिंडीच यांना वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे निकटवर्तीय मानले जाते. तसेच ज्या ठिकाणी टेप रेकॉर्ड केला गेला तो फ्लॅट झेलेन्स्की यांचाच आहे. त्यामुळे युक्रेनच्या राजकारणात हा मुद्दा अतिशय संवेदनशील ठरू शकतो.
रशिया अन् युक्रेनमधला संघर्ष धगधत असतानाच नव युद्ध उभ राहणार?, चीनकडून हजारो सैनिक तयार