‘जन्मदर घटला, आता लग्न करून मुलं जन्माला…’, शी जिनपिंग यांचा चिनी महिलांना सल्ला

  • Written By: Published:
‘जन्मदर घटला, आता लग्न करून मुलं जन्माला…’, शी जिनपिंग यांचा चिनी महिलांना सल्ला

China population : जगात सर्वाधिक लोकसंख्येचा रेकॉर्ड वर्षानुवर्ष आपल्या नावावर कायम राखणाऱ्या चीनला गेल्या वर्षीच्या आकड्यांनी चांगलाच झटका दिला. सध्या चीनमध्ये जन्मदरात मोठी घट झाली. एकीकडे चीनची लोकसंख्या हळूहळू वृद्ध होत आहे, तर दुसरीकडे चीनचा प्रजनन दरही नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळं चीन सरकार घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनीही या समस्येकडे देशाचे लक्ष वेधलं. घटना जन्मदर हे देशासमोरचं आव्हान असल्यानं महिलांनी त्यासाठी योगदान द्यावं, मुलं जन्माला घालावी, असं वक्तव्य त्यांनी केलं.

‘तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?’ स्पर्धकाच्या सवालावर बिग बीं यांचा मोठा खुलासा 

सध्या चिनी सरकार नागरिकांना मूल होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. याव्यतिरिक्त, प्रजननास पाठिंबा देण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवत आहे. असं असलं तरी नागरिक सरकारी प्रयत्नांना जुमानत नसल्याचं दिसतं. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये झालेल्या ऑल चायना वुमेन्स फेडरेशनच्या बैठकीत बोलताना जिनपिंग म्हणाले, चीनमध्ये 2022 मध्ये जन्मदरात विक्रम घट नोंदवली गेली. देशात गेल्या वर्षी जन्मलेल्या बालकांच्या संख्येत 10 टक्क्यांनी घट झाली. चिनी महिला आता मुलं जन्माला घालणं टाळत आहेत. मात्र, महिलांचा विकासाचं मोजमाप केवळ नोकरी करणं, काम करणं नाही. तर कौटुंबिक सौहार्द, सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रविकासासाठी त्यांनीही प्रयत्न केले पाहिजे.

World Cup : आफ्रिकेच्या फंलदाजांनी कांगारुंसमोर नांग्या टाकल्या! खराब सुरुवातीनंतर डाव सांभाळण्याचा प्रयत्न 

जिनपिंग म्हणाले की, आजच्या तरुणांनी लग्न आणि मुलं जन्माला घालण्यासाठीची आपली विचारसरणी मजबूत करण्याची गरज आहे. सध्या देशासमोर वृद्धत्वाची लोकसंख्या आणि जन्मदरात विक्रमी घसरण हे आव्हान आहे. त्यामुळं महिलांनी विवाह करून मुलं जन्माला घालण्यावर भर दिला पाहिजे.

दरम्यान, तज्ज्ञांचा दावा आहे की, उच्च बाल संगोपन खर्च, करिअरमधील अडथळे, लिंगभेद आणि लग्न न करण्याची इच्छा या कारणांमुळे अनेक तरुण चिनी महिलांना मुले होण्यापासून रोखतात. जानेवारीमध्ये, चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने सहा दशकांत प्रथमच लोकसंख्येमध्ये घट नोंदवली आणि सांगितले की देशाची लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे. तर देशांतर्गत लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणतात की चीन श्रीमंत होण्याआधीच वृद्ध होईल, ज्यामुळे महसूल कमी होईल आणि कर्ज वाढेल. अर्थव्यवस्था मंद होईल.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube