Congress अविनाश बागवेंचा भाजप प्रवेश… नाना पटोले काय बोलले ?
पुणे : पुणे शहरातील कॉंग्रेस (Congres) पक्षाचे अविनाश बागवे (Avinash Bagve) हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. अविनाश बागवे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. त्यामुळे ते नाराज असून आपल्या वडिलांसह माजी मंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांच्यासह काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या तयारीत आहेत, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. याबाबत खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आता मी अविनाश बागवे यांना शेजारी उभा करतो. मग तुम्ही काय बोलणार आहात, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी बागवे यांच्याच प्रभागातील रशीद शेख यांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता पक्षात प्रवेश घेण्यात आला आहे. त्यामुळे माजी मंत्री रमेश बागवे आविनाश बागवे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अविनाश बागवे हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अविनाश बागवे यांच्या संदर्भात सुरु असलेल्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत नाना पटोले म्हणाले की, अविनाश बागवे किंवा रमेश बागवे हे दोघेही नाराज नाहीत. काहीही तथ्य नसलेल्या या प्रकरणात काही लोकांकडून मुद्दामहून रंग देण्याचे काम केले जात आहे.