Union Budget 2023 : नव्या संकल्पना घेऊन पुढे.., बजेटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन

Union Budget 2023 : नव्या संकल्पना घेऊन पुढे.., बजेटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन

नवी दिल्ली : अमृत काळातला भारताचा हा पहिला बजेट विक्षित भारताच्या विराट संकल्पाला पूर्ण करण्यासाठी मदत करणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. तसेच जनतेनं नव्या संकल्पना घेऊन पुढे चालून समृध्द आणि संपन्न बनवूया असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलंय.

पंतप्रधान मोदी म्हणाले, हे बजेट देशातील वंचित समाज, गरीब, शेतकरी, सर्वसामान्यांच्या स्पप्नांना पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. आपल्या देशातील सर्वच मजुर वर्गासाठी या बजेटमध्ये अधिकाधिक योजना आणलेल्या आहेत. अशा लोकांसाठी ट्रेनिंग, टेक्नॉलॉजी आणि व्यापारासाठी सरकार अनुकूल असल्याचं पंतप्रधानांनी म्हंटलंय.

तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या सुखमय जीवनासाठी सरकारकडून अनेक मोठी पाऊले उचलण्यात आली असून ‘ह्यूमन सेल्फ वेल्थ’ ग्रूप महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. जनधन योजनेनंतर ही योजना सामान्य महिलांना मजबूत करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

त्याचप्रमाणे श्रीअन्न’ योजनेमुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून या बजेटमध्ये मच्छीमार आणि दुध उत्पादकांसाठी अनेक नव्या योजना आणण्यात आल्या आहेत. त्यासोबतच कृषी क्षेत्रासाठीही अनेक योजना अंमलात आल्या असून बजेटमुळे कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

तसेच सुपर फूडला आता ‘श्रीअन्न’ अशी नवी ओळख देण्यात आलीय, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना अर्थिक सन्मान मिळणार आहे. त्यासोबतच बजेटमध्ये नव्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागालाही प्राधान्य देण्यात आलंय.

अभूतपूर्व गुंतवणूक भारताला विकासाची नवी दिशा देणार असून या बजेटमध्ये उद्योगांसाठी क्रेडिट सपोर्ट रिफॉर्म अभियानाला नवी दिशा देण्यात आलीय. तसेच एमएसएमईसाठी नव्या तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत.

समृध्द आणि विकसित भारताचं स्पप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना सशक्त बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. बजेमध्ये मध्यमवर्गीयांना करामध्ये सवलती दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube