जुन्नरमध्ये NIAची छापेमारी; निघालं ऑपरेशन सिंदूरशी कनेक्शन

NIA Raids Junnar ऑपरेशन सिंदूरदरम्यान सरकारी वेबसाइट्सवर सायबर हल्ल्याच्या प्रयत्नाच्या तपासात NIAची जुन्नरमध्ये छापेमारी.

NIA Raids Junnar

NIA Raids Junnar Over Cyberattack Case : ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) काळात केंद्र सरकारच्या 54 वेबसाइट्सवर डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसने (DDoS) सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये छापेमारी केली. सायबर दहशतवादाशी संबंधित या प्रकरणाच्या तपासात देशातील विविध ठिकाणी NIA ने कारवाई केली आहे. त्यापैकी जुन्नर हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

FDA ची मोठी कारवाई; नागपुरात 2 कोटींचा भाजलेल्या सुपारीचा साठा जप्त

NIAच्या पथकाने जुन्नरमधील माहीमऊल्ला परिसरातील एका घरावर छापा टाकला. तेथील एका संशयितांची त्यांनी झडती घेत डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल फोन, पेनड्राइव्हसह इतर डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, सरकारी वेबसाइट्स ठप्प करण्याच्या उद्देशाने DDoS हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी आरोपींना तांत्रिक मदत किंवा प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींचा तपास NIAकडून सुरू आहे.

FDAची धडक कारवाई; मुंबईत AYUB’Sचा परवाना निलंबित, पुणे-जळगावमध्ये संशयित अन्नसाठा जप्त

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तांत्रिक तपासातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे जुन्नरसह NIAने गुजरातमधील नडियाद, तेलंगणातील रामागुंडम, बिहारमधील गोपालगंज आणि दिल्ली येथे छापे टाकले. जप्त डिजिटल उपकरणांच्या तपासातून या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

follow us