अभिषेक बच्चनला मिळाला पहिला फिल्मफेअर! ‘I Want To Talk’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

अभिनेता अभिषेक बच्चन, ज्याने आपल्या 'I Want To Talk' या चित्रपटासाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.

Abhishek Bachchan Firts Filmfare

Abhishek Bachchan Firts Filmfare : बॉलीवूडमधील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमधील अहमदाबाद येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडला. 70 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला अभिनेता अभिषेक बच्चन, ज्याने आपल्या ‘I Want To Talk’ या चित्रपटासाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे, हा पुरस्कार त्याला वडील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी मिळाल्याने अभिषेकसाठी हा क्षण अधिकच भावनिक ठरला.

अभिषेक बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

अभिषेकला (Abhishek Bachchan) हा पुरस्कार कार्तिक आर्यनसोबत संयुक्तपणे देण्यात आला. कार्तिकला त्याच्या प्रेरणादायी “चंदू चॅम्पियन” या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना अभिषेक आपल्या (Filmfare Awards) भावना लपवू शकला नाही. त्याने मंचावर येताच डोळ्यातील अश्रू पुसले आणि भावुक होत म्हणाला, इंडस्ट्रीत येऊन 25 वर्षं झाली. या पुरस्कारासाठी कित्येक वेळा भाषणाची तयारी केली होती, पण प्रत्यक्षात मिळेल असं वाटलं नव्हतं. आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे. हा क्षण माझ्यासाठी (Bollywood) अविस्मरणीय आहे.

25 वर्षांच्या चिकाटीचा सन्मान

माझ्या सर्व दिग्दर्शक, निर्माते आणि सहकलाकारांचे मी मनःपूर्वक आभार (Entertainment News) मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि नवनवीन संधी दिल्या. हा प्रवास सोपा नव्हता, पण आज त्या सर्व मेहनतीचं फळ मिळालं आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या 25 वर्षांच्या चिकाटीचा सन्मान आहे. ऐश्वर्या आणि आराध्या, तुम्ही मला माझी स्वप्नं जगू दिलीत, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. तुमच्या त्यागामुळेच मी इथे उभा आहे. हा पुरस्कार मी दोन खास व्यक्तींना अर्पण करतो — माझ्या वडिलांना आणि माझ्या मुलीला.

फिल्मफेअर 2025 सोहळा

जरी या खास प्रसंगी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या उपस्थित नव्हत्या, तरी अभिषेकच्या भाषणात त्यांच्याबद्दलचा अभिमान आणि प्रेम स्पष्टपणे झळकत होता. वडिलांच्या वाढदिवशी मुलाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्याने बच्चन परिवारासाठी हा दिवस नक्कीच अभिमानाचा आणि भावनिक ठरला.

follow us