अजिंक्य रहाणेच्या खात्यात दरमहा येणार इतकी पेन्शन; BCCI च्या नियमांमुळे होणार मोठा फायदा
Ajinkya Rahane भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने निवृत्ती घेतली. या निवृत्ती घेतलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटूंना दरमहा किती पेन्शन मिळते?
Ajinkya rahane monthly pension : कोणताही सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला दरमहा पेन्शन मिळते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण क्रिकेटपटूंनाही निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, हे तुम्हाला माहीत आहे का? भारतातील अनेक माजी क्रिकेटपटूंना (Indian Cricketer) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) पेन्शन दिली जाते. अलीकडेच भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने निवृत्ती घेतली आहे. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, या निवृत्ती घेतलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटूंना दरमहा किती पेन्शन मिळते? चला, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कॉकरोच जनता पार्टीत अंतर्गत बंड? दिपके यांच्या घरासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम क्रिकेट बोर्डांपैकी एक मानले जाते. त्यामुळेच क्रिकेट क्षेत्रातल्या खेळाडूंच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकी निवृत्त क्रिकेटपटूंना दिली जाणारी पेन्शन योजना ही सर्वात विशेष मानली जाते. विशेष म्हणजे, अशा प्रकारे आपल्या माजी क्रिकेटपटूंना नियमित मासिक पेन्शन देणारे BCCI हे जगातील एकमेव क्रिकेट बोर्डांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे आर्थिकदृष्ट्या मजबूत क्रिकेट बोर्डही त्यांच्या माजी खेळाडूंना अशा स्वरूपाची मासिक पेन्शन देत नाहीत.
चंद्रशेखर बावनकुळेंनीच कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले; मनोज जरांगेंचा थेट आरोप
भारतीय संघाचा (Indian Cricket Team) अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने 25 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले असल्यामुळे तो BCCI च्या पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतो. 1 जून 2022 पासून लागू करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार, 25 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंना दरमहा 70 हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. त्यामुळे अजिंक्य रहाणे यालाही 70 हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. तर 25 पेक्षा कमी कसोटी सामने खेळलेल्या माजी खेळाडूंना दरमहा 60 हजार रुपये मिळतात.
कॉकरोच जनता पार्टी पुढं काय करणार? सीजेपीच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरमधून मोठी घोषणा
याशिवाय, माजी भारतीय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना दरमहा 52,500 रुपयांची पेन्शन दिली जाते. 2003 पूर्वी निवृत्त झालेल्या पात्र प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना 45,500 रुपये, तर इतर पात्र प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना दरमहा 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा लाभ केवळ भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंनाच मर्यादित नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय योगदान देऊन निवृत्त झालेल्या पात्र क्रिकेटपटूंनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
‘नो इन्शुरन्स, तर नो पेट्रोल’ पण, गाडीचा विमा आहे की नाही सरकारला कळणार कसं?
माजी क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने BCCI ने 2004 मध्ये ही पेन्शन योजना सुरू केली होती. सुरुवातीच्या काळात 174 माजी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन दिली जात होती. त्यानंतर काळानुसार या रकमेत अनेकदा वाढ करण्यात आली आणि 2022 मध्ये पेन्शनच्या रकमेत मोठी वाढ करून सध्याची सुधारित रचना लागू करण्यात आली.