भाजप लागला 2029’च्या तयारीला! पक्षसंघटनेत खांदेपालट, देशभरात प्रभारींची नियुक्ती, वाचा यादी
BJP Incharge List Announced : भाजपने देशभरातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करत नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची राज्यनिहाय नियुक्ती जाहीर केली आहे.
भाजपने पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करत (BJP) बुधवारी नवीन प्रभारी आणि सहप्रभारींची राज्यनिहाय यादी जाहीर केली. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील चार नेत्यांवरही महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे दिल्ली भाजपचे प्रभारीपद देण्यात आलं असून, विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती झाली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सूत्रं हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेत बदलांची प्रक्रिया सुरू आहे. विविध राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नव्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदी राज्यसभा खासदार बैजयंत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली असून, अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत यांच्यावर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय हरीश द्विवेदी यांच्याकडे कर्नाटक आणि बिहार, स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगढ आणि हरियाणा, तरुण चुग यांच्याकडे गुजरात, श्रीकांत शर्मा यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि राम माधव यांच्याकडे उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे.
मोठी बातमी: राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; राहुल गांधींच्या एका फोननंतर निर्णय बदलला
महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्यावर पक्षनेतृत्त्वाकडून पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे प्रभारीपद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्याचवेळी मेधा कुलकर्णी यांनाही उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी संधी मिळाली आहे. भाजपच्या नव्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अनेक तरुण नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. भाजपच्या प्रभारी आणि सहप्रभारींची राज्यनिहाय यादी पुढीलप्रमाणे.
1. अंदमान & निकोबार
प्रभारी – श्री जय प्रकाश, दिल्ली
2. अरुणाचल प्रदेश
प्रभारी – डॉ. देवेश कुमार, बिहार
3. आंध्र प्रदेश
प्रभारी – डॉ. अरविंद भदौरिया
सह प्रभारी – श्रीमती वनथी श्रीनिवासन
4. असम
प्रभारी – श्री मंगल पांडे
सह प्रभारी – श्रीमती फांग्नोन कोन्याक
सह प्रभारी – श्री मनोज टिंग्गा
5. बिहार
प्रभारी – श्री हरीश द्विवेदी
सह प्रभारी – श्रीमती संगीता यादव
सह प्रभारी – श्री रोहन गुप्ता
6. चंडीगढ़
प्रभारी – श्री महेंद्र पांडे
7. छत्तीसगढ़
प्रभारी – श्रीमती स्मृति ईरानी
सह प्रभारी – श्री सिद्धार्थ शम्भू
8. दादरा नगर हवेली & दमन एवं दीव
प्रभारी – श्रीमती वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी
9. दिल्ली
प्रभारी – डॉ. विनय सहस्रबुद्धे
सह प्रभारी – श्री जामयांग त्सेरिंग नामग्याल
सह प्रभारी – श्रीमती दर्शानाबेन जरदोश
10. गोवा
प्रभारी – डॉ. भारती प्रवीन पवार
सह प्रभारी – श्री अनिल एंटनी
11. गुजरात
प्रभारी – श्री तरुण चुघ
सह प्रभारी – श्री अजय महावर
सह प्रभारी – श्रीमती गोमती साई
12. हरियाणा
प्रभारी – श्रीमती स्मृति ईरानी
सह प्रभारी – डॉ. भोला सिंह
13. हिमाचल प्रदेश
प्रभारी – श्री श्रीकांत शर्मा
सह प्रभारी – श्रीमती दर्शना सिंह
14. जम्मू & कश्मीर
प्रभारी – डॉ. सतीश पूनिया
सह प्रभारी – श्रीमती रीना कश्यप, हिमाचल प्रदेश
15. झारखंड
प्रभारी – श्री गजेंद्र पटेल
सह प्रभारी – श्री सौरभ सिंह
सह प्रभारी – श्रीमती निवेदिता सिंह, बिहार
16. कर्नाटक
प्रभारी – श्री हरीश द्विवेदी
सह प्रभारी – डॉ. के. वेंकटेश्वरलू
17. केरळ
प्रभारी – प्रो. एम. नागराजा
सह प्रभारी – श्री एम. वेंकटेशन
18. लडाख
प्रभारी – श्री राजकुमार भाटिया, दिल्ली
19. लक्षद्वीप
प्रभारी – श्री जॉर्ज कुरियन
20. मध्य प्रदेश
प्रभारी – श्री बबलू कुमार देव
सह प्रभारी – श्रीमती रेखा वर्मा
21. महाराष्ट्र
प्रभारी – श्री बैजयंत जय पांडा
सह प्रभारी – श्री अमित मालवीय
सह प्रभारी – श्री सदानंद शेट तानावडे
सह प्रभारी – श्रीमती कमलजीत सहरावत
22. मणिपुर
प्रभारी – डॉ. राजदीप रॉय
23. मेघालय
प्रभारी – श्री कनाद पुरकायस्थ
सह प्रभारी – डॉ. नुमल मोसमन, असम
24. मिजोरम
प्रभारी – डॉ. भगवत कराड
25. नगालैंड
प्रभारी – श्री अनिल एंटनी
26. ओडिशा
प्रभारी – श्रीमती डी. पुरंदेश्वरी
सह प्रभारी – डॉ. स्वदेश सिंह
27. पुडुचेरी
प्रभारी – श्री के. सुरेंद्रन
28. पंजाब
प्रभारी – डॉ. सतीश पूनिया
सह प्रभारी – श्री वीरेंद्र सचदेवा
सह प्रभारी – श्रीमती (डॉ.) अलका गुर्जर
29. राजस्थान
प्रभारी – श्री संजय भाटिया
सह प्रभारी – श्रीमती कविता पाटीदार
सह प्रभारी – श्री कुलजीत चहल
30. सिक्किम
प्रभारी – श्री राजू बिस्ता
31. तमिळनाडू
प्रभारी – श्री राम माधव
सह प्रभारी – श्री निर्मल कुमार सुराणा
सह प्रभारी – श्रीमती डी. के. अरुणा
32. तेलंगाणा
प्रभारी – श्री सुनील बंसल
सह प्रभारी – श्री अभय पाटिल
सह प्रभारी – श्रीमती रेखा शर्मा
33. त्रिपुरा
प्रभारी – श्री मृगांका देव बर्मन
34. उत्तर प्रदेश
प्रभारी – श्री विनोद तावड़े
सह प्रभारी – श्री जगदीश पटेल
सह प्रभारी – श्रीमती मेधा कुलकर्णी
सह प्रभारी – डॉ. प्रदीप शर्मा
सह प्रभारी – श्री अनंत ओझा
35. उत्तराखंड
प्रभारी – श्री राम माधव
सह प्रभारी – श्री अरविंद मेनन
सह प्रभारी – सुश्री बांसुरी स्वराज
36. पश्चिम बंगाल
प्रभारी – श्री सुनील बंसल
सह प्रभारी – श्री लाल सिंह आर्य
सह प्रभारी – श्री राजेंद्र सिंह, बिहार
सह प्रभारी – श्रीमती पिंकी कुशवाहा, बिहार