Vivek Vihar AC Fire : दिल्लीतील विवेक विहारमध्ये मोठी दुर्घटना; घरात एसीचा स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Vivek Vihar AC Fire : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, दिल्लीतील शाहदरा भागातील विवेक विहार परिसरात एका चार मजील
Vivek Vihar AC Fire : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, दिल्लीतील शाहदरा भागातील विवेक विहार परिसरात एका चार मजील इमारतीला भीषण आग लागल्याने आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसीचा स्फोट होऊन आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग ‘B-13’ या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली होती नंतर हळूहळू संपूर्ण इमारतीत पसरली. सुमारे अडीच तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर, सकाळी 6.25 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आगीवर नियंत्रण अग्निशमन नियंत्रण कक्षाला पहाटे 3.48 शमन दलाच्या 14 गाड्या (फायर टेंडर्स) रवाना करण्यात आल्या. अथक प्रयत्नांनंतर, सकाळी 6.25 च्या सुमारास आगीवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवण्यात आले. तरीही, इमारतीमध्ये शोधकार्य अजूनही सुरूच आहे.
या घटनेबाबत माहिती देताना, डीसीपी (शाहदरा) आर.पी. मीना यांनी सांगितले की, आगीची माहिती मिळताच पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांनी यावर भर दिला की, इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करणे, हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते.
#WATCH | Delhi: A fire broke out in a 4-storey building in Vivek Vihar, Shahdara. So far, 3-4 bodies have been found. Several fire tenders are on the spot. pic.twitter.com/4T0lxZeJPW
— ANI (@ANI) May 3, 2026
लोकांनी काय सांगितले?
स्थानिकांच्या मते, आग इतक्या वेगाने पसरली की, लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आजूबाजूचा परिसर रिकामा केला असून, नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मदत आणि बचावकार्य सध्या सुरू असून, ढिगाऱ्याखाली काही व्यक्ती अजूनही अडकल्या असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कारवाई करा अन्…, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली पुण्यातील घटनेची दखल-
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहाटेच्या वेळी आगीचा वेगाने झालेला प्रसार यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. चरणजीत सिंग या स्थानिक रहिवाशाने सांगितले, घटनास्थळी दहापेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाल्कनींच्या माध्यमातून सुमारे 20 लोकांची सुटका केली.