रत्नागिरी-सिंधुदुर्गात किरण सामंतांची विकेट? राणेंनी दावा ठोकताच निवडणुकीतून घेतली माघार

रत्नागिरी-सिंधुदुर्गात किरण सामंतांची विकेट? राणेंनी दावा ठोकताच निवडणुकीतून घेतली माघार

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : राज्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच पत्रकार परिषद घेत या मतदारसंघावर दावा ठोकला होता. त्यानंतर लगेचच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघातून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांची माघार अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत ट्विट करत स्वतः सामंत यांनीच या निर्णयाची माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Narayan Rane : माझ्यावर टीका करतो, एक दिवस चोप देणार; भास्कर जाधवांना थेट नारायण राणेंची धमकी !

या मतदारसंघात किरण सामंत इच्छुक होते. त्यांनी निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली होती. तिकीट मिळाले नाही तर बंडखोरीचीही तयारी त्यांनी केली होती. याआधी त्यांनी तसे संकेतही दिले होते. परंतु, बंधू उदय सामंत यांच्या राजकारणाचा विचार करून त्यांनी इरादा बदलला होता. तरी देखील या मतदारसंघासाठी ते तयारी करत होते. हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने त्यांची दावेदारी मजबूत मानली जात होती. परंतु, भाजपनेही या मतदारसंघावर दावा ठोकला होता.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजपला हवा होता. राणे यांना तशा सूचनाही पक्ष श्रेष्ठींनी दिल्या होत्या. यानंतर काल राणे यांनी पत्रकार परिषद घेत या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल असे स्पष्ट सांगितले होते. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली होती. रत्नागिरी मतदारसंघ घ्या पण ठाणे किंवा कल्याण मतदारसंघ द्या अशी अट टाकत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केली होती.

कल्याण मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मतदारसंघ भाजपला देणे शिंदे यांच्यासाठी परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे कदाचित रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला सोडला असावा अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आता किरण सामंत यांनी माघार घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर एकनाथ शिंदे त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Lok Sabha Election: वंचितची पुणे, शिरुरमध्ये मोठी खेळी; तगडे उमेदवार कुणाला आणणार गॅसवर? 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज