मनोज जरांगेंचा माढ्यातून सरकारला थेट इशारा; वेळ पडली तर कोणाचा जीवही घेऊ…

Manoj Jarange Madha Sabha कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरून सरकारला थेट इशारा, मराठा आरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार

Manoj Jarange Patil Madha Sabha

Manoj Jarange Patil Madha Sabha : मराठवाड्यातील चार कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) रद्द केल्याने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)  खुप आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. माढा (Madha) येथे आयोजित सभेत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.

Manoj Jarange : त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा; फडणवीसांनंतर जरांगेंच्या टार्गेटवर आयुक्त

माढ्यात जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन दुपारी 3 वाजता करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या व्यस्त दौऱ्यामुळे सभा रात्री उशिरा पार पडली. रात्री साडेअकराच्या सुमारास जरांगे पाटील माढ्यात दाखल झाले. यावेळी समर्थकांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत त्यांचे जोरदार स्वागत केले. माढ्यातील सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र शब्दांत मांडली. “मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका,” असा थेट इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला. तसेच भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांबाबत सरकारने फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Maratha Reservaiton : 29 ऑगस्टपासून शेवटचं निर्णायक आंदोलन…मनोज जरांगे यांचा सरकारला अल्टिमेटम!

बावनकुळेंवरही जरांगेंचा निशाणा

माढ्यातील सभेत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली. गेल्या वर्षभरात आपण देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फारसे बोललो नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, आता मराठा समाजाच्या प्रश्नावर आपण कोणालाही सोडणार नाही. मराठा समाजाच्या अन्नात माती कालवणाऱ्या कोणालाही हा समाज माफ करणार नाही,” असे जरांगे म्हणाले.

वैरागमध्ये फडणवीस-शिंदेंवर टीका

माढ्याच्या सभेपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे झालेल्या कार्यक्रमातही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना कितीही वळवळ करू द्या, यांचा माज मोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही.” देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या शिंदे साहेबांनी मराठ्यांना 58 लाख नोंदी दिल्या, त्यांच्याच सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी या नोंदी रद्द करण्याचा घाट घातला आहे, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil : ‘एकही गरीब मराठा वंचित राहणार नाही, पुन्हा मराठे आंदोलनाच्या पवित्र्यात, गप्प बसणार नाही…’

कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या प्रश्नावरून सरकारमधील नेत्यांमध्येच वेगवेगळ्या भूमिका असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करत त्यांनी आपला लढा पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत दिले.

दरम्यान, मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

follow us