रुग्णालयाच्या PICU मध्ये मध्यरात्री आग; 9 नवजात शिशू सुखरूप, मोठी दुर्घटना टळली

Asian Hospital Chhatrapati Sambhajinagar Fire आग लागल्याचे समजताच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सर्व नवजात शिशूंना सुरक्षित बाहेर काढले.

Asian Hospital Fire Chhatrapati Sambhajinagar

Midnight Fire Breaks Out at Asian Hospital in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटल बाल अतिदक्षता विभागात  (PICU) काल (3 सप्टेंबर) मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी त्या विभागात 9 नवजात शिशूंना होती. आग लागल्याचे समजताच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी सर्व नवजात शिशूंना सुरक्षित बाहेर काढले. तसेच 55 रुग्णांनाही सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय मुंबईत सुखरूप परतले; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत

सध्या वैद्यकीय पथकाकडून शिशूंच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे अतिदक्षता विभागाचे नेमके किती नुकसान झाले, याचीही माहिती समोर आलेली नाही. अग्निसुरक्षा यंत्रणेची पाहणी करून आगीच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Manoj Jarange : 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर कुणबी नोंदी होणार ; मंत्री विखेंची मोठी घोषणा

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विभागाला लागलेल्या आगीची घटना अद्याप ताजी असतानाच रुग्णालयात पुन्हा आगीची घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. या घटनेनंतर रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.

World Cup 2027 रोहित शर्मा खेळणार का? बीसीसीआयने दिली चाहत्यांना मोठी बातमी

राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षात किती सक्षम आहे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक व्यवस्था आहे का, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

follow us