‘नाना पाटेकरांसारखा अभिनेता, देशभक्त आणि समाजसेवक गमावला’; फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

CM Fadanvis On Nana Patekar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

CM Fadanvis On Nana Patekar Death

CM Fadanvis On Nana Patekar Death: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे आज (8 ऑक्टोबर) वयाच्या 75व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी पहाटे गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्र आणि देशभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

विश्वनाथ पाटेकर ते नाना पाटेकर… हा प्रवास होता संघर्षातून घडलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

‘सिनेसृष्टीचं मोठं नुकसान’

फडणवीस म्हणाले की, भारतीय सिनेसृष्टीने एक अत्यंत ताकदीचा आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे. ‘क्रांतिवीर’पासून ‘नटसम्राट’पर्यंत विविध चित्रपटांमधून नाना पाटेकर यांनी केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही, तर आपल्या भूमिकांमधून समाजाचं प्रबोधनही केलं.

 

नाना पाटेकर यांची ओळख केवळ अभिनेता म्हणून नव्हती, तर एक देशभक्त आणि समाजसेवक म्हणूनही होती. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं. शेतकरी आणि सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम पुढे असायचे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

एमपीएससी आंदोलनाला हायकोर्टाचा दणका; विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरील आंदोलनाबाबात थेट आदेश

‘ते माझ्या मोठ्या भावासारखे होते’

नाना पाटेकर यांच्याशी आपले वैयक्तिक आणि जवळचे संबंध होते, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली. ‘ते माझ्या मोठ्या भावासारखे होते. ते मला मार्गदर्शन करायचे. ते खूप संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते,’ असं फडणवीस म्हणाले.

“अंगावर धावून आला, धमकी दिली”;शिवराज मोरेंनी वाचवलेल्या मुलीने सत्य सांगितले

‘नाना पाटेकरांसारखा एक अभिनेता, देशभक्त आणि समाजसेवक आपल्यातून निघून गेल्याने आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा या अलौकिक व्यक्तिमत्त्वाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहिली.

follow us