दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा
परिस्थिती नियंत्रणाबाहेर बाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांवर लाठीचाज केला.
Police lathi-charge protesters : नवी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन अधिक तीव्र झाल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. या दरम्यान जंतर मंतर परिसरात दगडफेकीची घटना घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर बाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांवर लाठीचाज केला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा देखील वापर करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत सरकारविरोधी घोषणा दिल्या. याच दरम्यान काही आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे सांगितले जात असून त्यानंतर दगडफेकीची घटना घडली. दगडफेक सुरू होताच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पहिले आंदोलकांना शांततेचे वातावरण केले. मात्र परिस्थिती अधिक चिघळत गेल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्जचा मार्ग अवलंबला.
ब्रेकिंग : विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर मोठं यशं; अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
लाठीचार्जनानंतर आंदोलनस्थळी एकाच धावपळ उडाली. अनेक आंदोलकांनी परिसरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर काही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या कारवाईनंतर काही काळासाठी संपूर्ण परिसर तणावपूर्ण बनला होता. घटनेनंतर जंतर मंतर आणि आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असल्याचे सांगितले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरातील हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
दरम्यान या घटनेत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तसेच किती जणांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याबाबत देखील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला यापूर्वीही काहीवेळा तणावपूर्ण वळण लागले होते. मात्र आज झालेल्या दगडफेक, लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरामुळे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या संपूर्ण घटनेनंतर राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.