संपदा पतसंस्था घोटाळा प्रकरणी पाच जणांना जन्मठेप

संपदा पतसंस्था घोटाळा प्रकरणी पाच जणांना जन्मठेप

Sampada Cooperative Credit Institution Scam : नगर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (Sampada Nagari Co-operative) आर्थिक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ज्ञानदेव वापरे (Gyandev Vavahe) व त्यांच्या पत्नी सुजाता वापरे (Sujata Vavahe) यांच्यासह तीन संचालकांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संपदा सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी (Sampada Cooperative Credit Institution scam) न्यायालयीन कोठडीत असलेल्या 17 आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

रश्मी बर्वे यांना मोठा धक्का, जात पडताळणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

दरम्यान या प्रकरणी सर्व आरोपींना दोषी धरून त्यांच्या शिक्षेबाबतही न्यायालयात युक्तिवाद झालेला होता यावरच अंतिम निर्णय देत आज न्यायालयाने ज्ञानदेव वादरे व त्यांचे पत्नी सुजाता तसेच साहेबराव भालेकर, रवींद्र शिंदे अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

रात्री साडेबारा वाजता शिवतारेंना फोन,अजित पवार म्हणाले, हृदयात कुठेतरी दुखतं …

दरम्यान या खटल्यामध्ये सरकारी पक्ष तर्फे वसंत ढगे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे ठेवीदारांच्या वतीने अनिता दिघे यांनी तर व्यवसायिकाच्या वतीने सुरेश लगड यांनी बाजू मांडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube