शरद पवारांकडून फडणवीस सरकारचं जाहीर कौतुक! NDA मध्ये जाण्याच्या चर्चांदरम्यान महत्त्वाचं विधान

Sharad Pawar यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल राज्यातील फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे.

Sharad Pawar

Sharad Pawar praises state government significant statement amidst speculations about joining the NDA : शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बुधवारी विधानसभेमध्ये भेट झाली. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. त्यानंतर राज्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार अशा चर्चा झाल्या. मविआतील घटक पक्ष काँग्रेस आणि उबाठाकडून देखील यावर दावे केले गेले. मात्र या सर्व चर्चा शरद पवारांच्या पक्षाकडून फेटाळून लावण्यात आल्या आहेत. त्यातच आता शरद पवारांनी राज्यातील फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे.

शरद पवारांकडून फडणवीस सरकारचं कौतुक!

राज्य सरकारने नुकताच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचं कौतुक शरद पवारांनी केलं आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीमध्ये जे बदल केले आहेत. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सुरूवातीला असलेल्या जाचक अटी सरकारने मागे घेतल्याबद्दल सरकारचं कौतुक आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या भावनांचा आदर कऱणारा आहे. असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारचं कौतुक केलं आहे.

FIFA World Cup 2026 : रोनाल्डो-मेसी ते लेकर एमबापे; फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडूंची ऐकून व्हाल थक्क!

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बुधवारी विधानसभेमध्ये भेट झाली. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. यावरून ठाकरेंची शिवसेना नाराज झाली आहे. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी नाराज होत थेट शरद पवारांवर या बैठकीवरून हल्लाबोल केला. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शरद पवारांच्या खासदारांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राऊत आणि चव्हांणांच्या दाव्याचे खंडन केले आहे.

follow us