पुणे PMC आणि MPSC पेपरफुटीवरून मेहबूब शेख आक्रमक; गाढवेंच्या पत्नी अन् ऋतुजा पाटलांची रँक अचानक वाढली कशी?

MPSC गैरप्रकारावर मेहबूब शेखांचा सवाल; सुनील गाढवेंच्या पत्नी आणि ऋतुजा पाटील यांच्या परीक्षेतील रँकमधील तफावतीवर चौकशीची मागणी.

Sunil Gadhave’s Wife and Rutuja Patil Rank Controversy

Sunil Gadhave’s Wife and Rutuja Patil Rank Controversy : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) स्थापत्य अभियंता पदासाठी झालेल्या परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी या प्रकरणावरून महापालिका आणि राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पेपरफुटी मान्य झाल्यानंतरही केवळ तीन उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करून इतर उमेदवारांना नियुक्ती देणे योग्य आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तुम्ही देव आहात आणि काहीही करू शकता असं वाटते का? कोर्टाने FDA ला फटकारले

पुणे महापालिकेतील स्थापत्य अभियंता पदासाठी IBPS या कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान पेपर सोडवत असल्याचा एक फोटो समोर आल्यानंतर पेपरफुटीचा मुद्दा चर्चेत आला. महापालिकेनेही परीक्षेतील गैरप्रकार मान्य केल्याचे मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.

‘MPSCमध्ये एकाला पेपर मिळाला, तर परीक्षा रद्द का?’

या प्रकरणाची तुलना करताना मेहबूब शेख यांनी नुकत्याच चर्चेत आलेल्या MPSC परीक्षेचा दाखला दिला. MPSCच्या परीक्षेत एका विद्यार्थिनीला पेपर मिळाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली. मग PMCच्या परीक्षेत तीन जणांना पेपर मिळाल्याचे मान्य असतानाही फक्त त्या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करून उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अकोल्यात 5 कोटींच्या भूखंड फसवणुकीने खळबळ; युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक

महापालिकेने उर्वरित उमेदवारांना नियुक्ती दिल्यास या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची संधीही प्रभावित उमेदवारांना मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

MMRDAच्या परीक्षेतील गुणांवरही सवाल

मेहबूब शेख यांनी MMRDAच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी झालेल्या परीक्षेतील गुणांवरही संशय व्यक्त केला आहे. काही उमेदवारांना पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत अत्यल्प गुण मिळाले, तर MMRDAच्या परीक्षेत त्याच उमेदवारांना तब्बल 200 पैकी 200 गुण मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

सुभाष चंद्रा यांच्या प्रकरणामुळे ‘हेअरकट’ पुन्हा चर्चेत; बँका हजारो कोटींचे कर्ज का सोडतात?

एकाच उमेदवाराच्या दोन वेगवेगळ्या परीक्षांमधील गुणांमध्ये एवढी मोठी तफावत कशी असू शकते, असा सवाल करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गाढवेंच्या पत्नी अन् ऋतुजा पाटलांची रँक अचानक वाढली कशी?

मेहबूब शेख यांनी MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारावरून आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात आमदार अभिमन्यू पवार आणि सुनील गाढवे यांचा संदर्भ देत काही कथित लिंक असल्याचा दावा त्यांनी केला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मोठ्या हालचाली; तीन महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

यासोबतच सुनील गाढवे यांच्या पत्नी पायल लांडे यांच्या परीक्षेतील रँकचा दाखला देत शेख यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, लांडे यांचा FDAच्या केमिकल ॲनालिसिस परीक्षेतील रँक 10 हजार 200 होता, तर तुलनेने अधिक कठीण असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेत त्यांना 31 वा क्रमांक मिळाला.

तसेच ऋतुजा पाटील यांच्या रँकबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला. फार्मासिस्ट ग्रुप-C परीक्षेत त्यांचा रँक 21 हजार 222 असताना ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेत 7 वा क्रमांक कसा मिळाला, असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला.

“एवढी मोठी तफावत दिसत असेल तर किमान चौकशी तरी का होऊ नये?” असा सवाल करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मेहबूब शेख यांनी सरकारकडे केली आहे.

‘सरकारने उत्तर द्यावे’

परीक्षांमध्ये गैरप्रकाराची शंका निर्माण होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे, अशी भूमिका मेहबूब शेख यांनी मांडली आहे. PMC, MMRDA आणि MPSCमधील परीक्षांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सरकारने स्पष्ट उत्तरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा ‘कापूसकोंडा’ चित्रपट 23 ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, विविध सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांवरून विद्यार्थी आणि राजकीय पक्षांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

follow us