ऑनलाइन फसवणुकीच्या बळींना मिळणार 25 हजारपर्यंतची भरपाई; RBI चा मोठा निर्णय; नवीन नियम काय?
Online Fraud : देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढत आहे. या वाढणाऱ्या डिजिटल व्यवहारांमुळे आपल्या देशात ऑनलाइन
Online Fraud : देशात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढत आहे. या वाढणाऱ्या डिजिटल व्यवहारांमुळे आपल्या देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ होताना दिसत आहे. बनावट केवायसी, फिशिंग लिंक्स, बनावट ॲप्स आणि इतर ऑनलाइन योजनांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होताना दिसत आहे. माहितीनुसार, फसवणुकीच्या अनेक प्रकरणात पीडितांना गमावलेले पैसे देखील परत मिळत नाही. त्यामुळे आता देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने नवीन नियम आणला आहे. ज्यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या बळींना मोठा दिलासा मिळू शकतो.
25 हजारपर्यंंत मिळणार भरपाई
आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, आता डिजिटल पेमेंट (Digital Payment) फसवणुकीच्या बळींना 25 हजार रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकते. हा नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होईल आणि भरपाई केवळ चौकशीनंतर व विशिष्ट अटींच्या अधीन राहूनच दिली जाईल.
भरपाई कोणाला मिळणार?
या नवीन नियमानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून अनधिकृत डिजिटल व्यवहार झाला असेल तर भरपाईसाठी ती व्यक्ती अर्ज करु शकते मात्र यासाठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाच दिवसांच्या आत ग्राहकाने आपल्या बँकेला त्याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. पाच दिवसांच्या आत तक्रार दाखल केली आणि चौकशीत दावा खरा ठरला तर ग्राहकाला 25 हजार रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकते. मात्र यासाठी अंतिम निर्णय हा चौकशीचे निष्कर्ष आणि आरबीआयने घालून दिलेल्या अटींवर अवलंबून असणार आहे.
तर दुसरीकडे आरबीआयने बँकांना देखील त्यांचे सुरक्षा सिस्टिम अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयने एआय, मशीन लर्निंग आणि ऑटोमॅटिक सिस्टिम संबंधित मॉडेल जोखील व्यवस्थापन बाबत मसुदा मार्गदर्शक देखील तत्वे जारी केली आहेत.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय करावे?
तुम्ही देखील ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलात तर त्वरित तुमच्या बँकेला माहिती द्या आणि घटनेबाबत अधिकृत तक्रार दाखल करा. तुम्ही जितक्या लवकर तक्रार कराल तितकी भरपाई मिळण्याची आणि तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते.
विधानसभेत सायबर फसवणुकीचा मुद्दा गाजला…आमदार दातेंच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री फडणवीसांचे उत्तर
राज्यात सायबर आर्थिक फसवणुकीचे 10 हजार 505 गुन्हे
राज्यात जानेवारी 2025 ते मे 2026 या कालावधीत राज्यात सायबर आर्थिक फसवणुकीचे 10 हजार 505 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2 हजार 379 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.