Video : पद्मसिंह पाटलांना त्रास देण्याचा प्रयत्न; पवनराजे हत्यांकांडाचा निकाल लागताच वकिल महाडीक काय म्हणाले?

सीबीआय काही करत नाही असं तक्रार त्या न्यायालयात करतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

News Photo   2026 06 20T144125.027

माफीचा जो साक्षिदार आहे पारसमल (Pawanraje) जैन याला माफिचा साक्षिदार ठेवता येत नाही. हा वारंवार वेगवेगळी मत नोंदवतो असं म्हणत पद्मसिंह पाटील यांची बाजू मांडणारे वकिल भूषण महाडीक यांनी माध्यमांसमोर निकालानंतर महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले खरे आरोपी सोडून याला फक्त राजकीय स्वरुप देऊन पद्मसिंह पाटील यांना त्रास देण्यात आला असं आरोपही त्यांनी यावेळी केला.

काही काळापूर्वी पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यावेळी नार्कोटेस्टची सीडी लीक करण्यात आली. 2008 मध्ये पनवराजे यांच्या पत्नी उच्च न्यायालयात गेल्या. तानाजी पाटील याची जी नार्को टेस्ट झाली त्याची सीटी माध्यमांमध्ये लीक करण्यात आली. पुढे त्यांनी हा तपास सीबीआयकडं देण्याची मागणी केली. पुढे 2009 पर्यंत सीबीआयने काही केलं नाही. पनराजेंच्या पत्नी आनंदीबाई पु्न्हा उच्च न्यायालयात जातात. सीबीआय काही करत नाही असं तक्रार त्या न्यायालयात करतात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पवनराजे हत्याकांड प्रकरण : पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

पद्मसिंह पाटील यांना अटक करणं हेच या लोकांचं ध्येय होत. ते केंद्रात मंत्री होतील अशी परिस्थिती असताना मोठ षडयंत्र रचलं गेलं असा आरोपही यावेळी महाडीक यांनी यावेळी केला. यातील साक्षिदार हा वारंवार बदलणारा आहे. तो मोठा व्यापारी असल्याचाही दावा करतो. मी पोलिसांचा खबरी आहे असा दावा हा साक्षिदार करतो असंही महाडीक यावेळी म्हणाले. जे म्हणाले माझा राजकीय जन्मच पवनराजे यांच्या हत्येमुळं झाला त्यांचा राजकीय शेवटही या खटल्यात संपणार असा थेट आरोपच वकिल महाडीक यांनी केला आहे.

ओमराजे काय म्हणाले?

मला वाटतं न्यायव्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. या खटल्याच्या निकालासाठी 20 वर्षांचा मोठा कालावधी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे. कोर्टाने राजकीय वैमनस्य होतं, हे मान्य केले आहे. सगळ्याचा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाच्या निकालाचे पूर्ण वाचन करुन आणि सीबीआय काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

पोलिसांच्या तपासात त्रुटी होती, ही वस्तुस्थिती आहे, कारण पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती, हा तपास सीबीयाकडे द्या. नंतर सीबीआयने तपास केला, मात्र मध्ये तीन वर्षे गेली. वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे, राजकीय वैमनस्य असल्याचे कोर्टाने मान्य केले, मग हत्या कोणी केली, असा सवाल सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला.

follow us