पवनराजे हत्याकांड प्रकरण : पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता.
PawanRaje Nimbalkar Murder Case Verdict : पवनराजे निंबाळकर यांच्या 20 वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात न्यायालयाने पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल वाचताना न्यायालयाने, “लोकनेत्याची हत्या करणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे निरीक्षण नोंदवले. या प्रकरणात 127 साक्षीदार तपासण्यात आल्याचे कोर्टाने सांगितले. कलियुग आहे वाईट गोष्टींना यश मिळत. चांगल्या बाबींना संघर्ष करावा लागतो. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोर्टाच्या निकालानंतर दिली आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
मोबाईल जप्त होणे अपेक्षित होते पण तपास अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. न्यायालयाला मोबाईल रेकॉर्डचा पुरावा मिळालेला नाही. साक्षीदाराने वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत त्याला इतर कुठलाही पुरावा नाही. इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी वारंवार राहिला होता असे सांगण्यात आले मात्र त्याचाही थेट कुठलाही पुरावा किंवा कागद रेकॉर्डवर दिलेला नाही असे निकाल वाचनात कोर्टाने नमूद केले. साक्षीदाराची आर्थिक गरज आणि विवंचना सिद्ध होत नाही. सगळ्यात महत्वाचं या प्रकरणात तपासादरम्यान कोणाचाही फोन जप्त करण्यात आला नव्हता, कोणाचेही सीडीआर मागवले नव्हते. आरोपींना अटक करताना त्यांच्या खिशात काय होते याचीही साधी नोंद नाही, अशी पोलीस अधिकारी आणि एकूणच प्रक्रियेवर कोर्टाने टिपण्णी केली आहे
‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’
साक्षीदाराला पैश्यांची गरज होती त्यामुळे त्याने आरोपी क्रमांक ३ कडे ५० हजारांची मागणी केली होती. त्यावर साक्षीदाराला आरोपी बोलला होता की ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ साक्षीदारांची अनेक घर, व्यवसाय आणि जंगम मालमत्ता होती आणि सगळे व्यवसाय भरभराटीला होते असे जबाब देतो त्यामुळे एवढ सगळं असताना साक्षीदार हा ५० हजार रुपये मागतो हे पटत नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकाल वाचनादरम्यान न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. साक्षीदाराने आर्थिक व्यवहार, शूटरला दिलेली रक्कम, शस्त्र खरेदी आणि आरोपींशी झालेल्या भेटींबाबत वेळोवेळी आपली विधाने बदलल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, साक्षीदाराने पद्मसिंह पाटील यांना मलबार हिल येथील बंगल्यात भेटल्याचा दावा केला, मात्र तेथे त्यांचा बंगला नसून कुलाबा येथे फ्लॅट होता. तसेच बिहारमधून शस्त्रे आणल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे किंवा प्रवासाची नोंद उपलब्ध नाही. राकेश मारिया यांच्या संदर्भातील दाव्यांचीही पडताळणी न झाल्याने या साक्षीदाराची साक्ष गृहीत धरण्याजोगी नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपींच्या प्रवासाचे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल वाचताना न्यायालयाने तपासातील अनेक त्रुटींवर प्रकाश टाकला. आरोपींनी विविध ठिकाणी रेल्वेने प्रवास केल्याचा दावा तपासात करण्यात आला, मात्र त्यासंदर्भातील कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, आरोपी इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होते, असा दावा करण्यात आला असला तरी त्यासंबंधीही कोणताही विश्वसनीय पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
जबाब नोंदवून न्यायाधीशाची स्वाक्षरीच नाही, कोर्टाने सीबीआयला फटकारलं
चार्जशीट दाखल होण्याच्या काही दिवस आधी पुन्हा माफीच्या साक्षीदाराचा जबाब नोंदवण्यात आला. त्याला प्रश्न विचारले उत्तरे घेतली. २४ तासांच्या ऐवजी १०० तासांचा वेळ दिला आणि पुन्हा बोलवून जबाब नोंदवला. आरोपीने काय सांगितलं, त्याचा हेतू काय आहे तो कोणत्या मनस्थितीत आहे आणि स्वेच्छेने देतोय का हे पाहायला हवं. पण जबाब नोंदवून न्यायाधीशानी त्यावर स्वाक्षरीच केली नाही असं कोर्टाने म्हटलं.
माफीचा साक्षीदाराच्या जबाबात बऱ्याच तफावती आहेत.दोन कबुलीजबाबात बरेच बदल आहेत. माफीच्या साक्षीदाराची अटक, त्याची घेतलेली अवैध कोठडी आणि घेतलेले दोन वेगवेगळे जबाब हे बारकाईने पाहणे कोर्टासाठी महत्वाचे आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. माफीच्या साक्षीदाराने न्यायालयात काही अर्ज दिलेले आहेत. माफीचा साक्षीदार सांगतोय की त्याला खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याला आजारपणाची औषध घेऊ दिली नाहीत. घटनेच्या दिवशी तो हजर नव्हता.
पारसमाल जैनच्या कबुलीजबाबावर न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालादरम्यान न्यायालयाने माफीचा साक्षीदार पारसमाल जैन याच्या कबुलीजबाबाबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. जैन याला 2009 मध्ये क्राईम ब्रांचने ताब्यात घेतल्यानंतर अनेक महिने बेकायदेशीरपणे ठेवण्यात आल्याचा दावा त्याने केला होता. या संदर्भात सरकारकडे कोणताही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, पारसमाल जैन अटक कसा झाला आणि कोणत्या परिस्थितीत त्याने कबुलीजबाब दिला, या सर्व बाबींचा सखोल विचार करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. निकाल वाचनादरम्यान या मुद्दयावर विशेष चर्चा करण्यात आली.
पारसमल जैन आणि दुसऱ्या आरोपीला कुठलाही प्रश्न न विचारता त्यांचा जबाब नोंदवला गेला
माफीचा साक्षीदार पारसमल जैन आणि दुसरा आरोपी यांना कुठलाही प्रश्न न विचारता त्यांचा जबाब नोंदवला गेला हे नियमात नाही त्यामुळे संशयाचं ढग इथे पहायला मिळत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच साक्षीदार फितुर झालेला आहे. हे पत्र पुराव्यात पुरक म्हणून घेता येत नाही त्यावरील हस्ताक्षर सही बरोबर आहे, मात्र माफीचा साक्षीदार कधी खर बोलतो कधी खोटं बोलतो त्यामुळे माफीचा साक्षीदाराचा पहिला जबाब झाला तो कायद्याला धरून नव्हता असे म्हणत सरकारी पक्षाचीही जबाबदारी होती त्यांनी ती नीट पार पाडलेली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार बदलेली साक्ष संशयास्पद असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणाचा पायाच ठिसूळ आहे न्यायालयाचे मोठं निरीक्षण
पवनराजे हत्याकांड सुनावणीत महत्त्वाची निरीक्षणे न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. पवनराजे खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदारावर मात्र माफीच्या साक्षीदार याला मारहाण केल्यानंतर त्याने कबुली दिली या प्रकरणाचा पायाच ठिसूळ असल्याचे न्यायालयाचे मोठं निरीक्षण. पवनराजे निंबाळकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचे समोर आल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच पवनराजे यांनी 2003 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र दिल्याचाही उल्लेख करण्यात आला. याशिवाय या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, केवळ त्या साक्षीपुरते मर्यादित न राहता तपासातून समोर आलेल्या इतर पुराव्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. निकाल वाचनादरम्यान न्यायालयाने मागील अनेक न्यायनिर्णयांची उदाहरणेही सांगितली.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा घटनाक्रम
3 जून 2006 : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
सुरुवातीचा तपास : सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी केला, मात्र नंतर पीडित कुटुंबाच्या मागणीवरून आणि संशयास्पद पार्श्वभूमीमुळे हा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला.
जून 2009 : सीबीआयने या प्रकरणात माजी मंत्री आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांना अटक केली. त्यांच्यावर राजकीय आणि व्यावसायिक वैमनस्यातून या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला.
सप्टेंबर 2009 : अलिबाग सत्र न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांना जामीन मंजूर केला.
जुलै 2011 : या खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला (Trial) सुरुवात झाली.
2011- 2026) : या काळात खटल्यामध्ये 128 साक्षीदारांची तपासणी झाली. यामध्ये अण्णा हजारे यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. पारसमल जैन हा या खटल्यातील माफीचा साक्षीदार बनला, ज्याने कटाबद्दल महत्त्वाचे खुलासे केले.
मे/जून 2026 : तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर या खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. न्यायाधीशांनी निकाल तयार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे तो पुढे ढकलला गेला.
20 जून 2026 : या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर होणे अपेक्षित.
न्याय देवतेने न्याय करावा – ओमराजे निंबाळकर
आयुष्यात ज्यासाठी संघर्ष केला, अपेक्षा हीच आहे की न्याय देवतेने न्याय करावा. ओमराजेंना बोलताना भावना अनावर झाल्या होत्या. भारतीय न्यायव्यस्थेवर माझा विश्वास आहे. त्या जोरावरच आम्ही मागील २० वर्षांपासून हा लढा देत आहोत.न्याय मिळण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय सर्वसामान्यांच्या लोकांच्या आशीर्वादाने मी दोन्ही लढाया लढतो. राजेसाहेबांच्या हत्येमुळेच मी राजकारणात आलो. आपल्याला राजकीय विरोधक नको म्हणून सुनियोजित कट रजून ही हत्या झाली होती, मला आपल्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, दोषींना फाशीच व्हावी, हीच माझी मागणी असल्याच्या भावना ओमराजेंनी निकाल येण्यापूर्वी व्यक्त केल्या होत्या. पण,